महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज

माचाळ पर्यटनस्थळी शांतता भंग करणाऱ्या पर्यटकांविरुद्ध पोलिसांकडून कारवाईचा बडगा

खोल दऱ्यांमुळे सेल्फी काढण्यास देखील मनाई

लांजा : लांजा तालुक्यातील समुद्रसपाटीपासून ४००० फुटावर असलेल्या माचाळ या पर्यटन स्थळाच्या ठिकाणी मद्यप्राशन आणि सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्यांविरुद्ध लांजा पोलिसांनी कडक कारवाई करण्या संदर्भातील फलक माचाळ येथे लावला आहे. माचाळकडे जाणारा रस्ता हा खोल दरीचा आणि दाट धुक्याचा असल्याने सेल्फी काढण्यास देखील पर्यटकांना मनाई करण्यात आली आहे.

लांजा पोलिसांनी पर्यटकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. लांजा पोलिसांनी माचाळ येथे लावलेल्या फलकावर माचाळ हे गाव पर्यटनस्थळ म्हणून घोषित केलेले आहे. हे ठिकाणी उंचावर असल्याने सदर ठिकाणचा रस्ता अरुंद आणि चढ-उताराचा असल्याने एका बाजूला दरीचा भाग असल्याने रस्त्यावर दरडी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यटकांनी आपली वाहने वेग मर्यादित चालवावीत त माचाळ मार्गावर आणि रस्त्यावर खोल दरीचा भाग असल्याने सेल्फी काढू नयेत, सावधगिरी बाळगावी माचाळ मार्गावर वाहन चालविताना मद्य प्राशन केल्याचे आढळल्यास मोटार वाहन अधिनियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सुचित केले आहे.

माचाळ पर्यटन ठिकाणी दारू पिऊन कोणी पर्यटकांनी शांतता भंग केल्यास कडक कारवाई करण्यात येईल असेही पोलिसांनी म्हटले आहे. यासाठी लांजा पोलीस ठाणे यांनी संकटकालीन संपर्क क्रमांक दिले आहेत लांजा पोलीस ठाणे 0235120033, पोलिस निरिक्षक 9967911308, बीट अंमलदार 7798943621, गोपनीय अंमलदार 7798943621.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button