शिक्षकांचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध : पालकमंत्री उदय सामंत

दापोली : राज्य सरकारच्या वतीने शिक्षकांचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असा विश्वास रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.
दापोली येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, कोकण विभाग शिक्षण परिषद व भव्य मेळाव्याच्या निमित्ताने ना. सामंत यांनी उपस्थित राहून शिक्षकांसोबत संवाद साधला.

यावेळी शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांविषयी त्यांनी माहिती घेतली आणि ते लवकरच सोडविण्यासाठी बैठक आयोजित केली जाईल, अशी ग्वाही दिली. सरकारच्या वतीने शिक्षकांचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असा विश्वासही यावेळी व्यक्त केला.
तसेच, भविष्यात शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या प्रत्येक बाबतीत सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
या प्रसंगी विजय कोंबे, उदय शिंदे, राजन कोरगावकर, दीपक शिंदे, संतोष पावणे, राजेश शिर्के, विजय येवले यांच्यासह मोठ्या संख्येने प्राथमिक शिक्षक समितीचे सदस्य उपस्थित होते.