मुंबई-गोवा चौपदरी महामार्गाच्या कामाचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

- पुढील शनिवारी घेणार पुन्हा आढावा
रत्नागिरी : जिल्ह्यातील बावनदी, वांद्री, संगमेश्वर या विविध ठिकाणी मुंबई-गोवा महामार्गाची रविवारी प्रत्यक्ष पाहणी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केली. जेथे खड्डे आहेत, त्या ठिकाणी तातडीने खड्डे भरावेत, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना ना. सामंत यांनी दिल्या.
दरम्यान, पुढील शनिवारी पुन्हा या रस्त्याची पाहणी करून आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या बांधकामाबाबत ओरड सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी रत्नागिरीपासून चिपळूणपर्यंत संपूर्ण रस्त्याची पाहणी अधिकाऱ्यांसह केली.
पाहणी दौऱ्या दरम्यान समोर आलेले मुद्दे
एकूण रस्ता – ३५५ किमी
🔹त्यातील ३३४ किमी म्हणजेच ९३.१८% काम पूर्ण
🔹 आरवली ते कांटे प्रलंबित (फक्त २०% काम बाकी)
🔹 उर्वरित २१.१९ किमी मध्ये साडेचार किमी डबल लेन काम पूर्ण व्हायचं आहे.
रविवारी केलेल्या या पाहणी दौऱ्या दरम्यान खड्डे असलेल्या ठिकाणी महामार्गावर खड्डे असलेल्या ठिकाणी पालकमंत्री नामदार सामंत यांनी प्रत्यक्ष थांबून पाहणे केली.
अपूर्ण असलेली साडेचार किमी डबल लेन पूर्ण होईल, तेव्हा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग पूर्णत्वास जाईल, असे पालकमंत्र्यांनी या दौऱ्यानंतर म्हटले आहे.