मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक १५ तासांनी पूर्ववत

रत्नागिरी: लिक्विडफाईड पेट्रोलियम गॅस भरलेला टँकर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर हातखंबा येथे उलटून विस्कळीत झालेली महामार्गावरील वाहतूक मंगळवारी दुपारच्या सुमारास तब्बल 15 तासांनी पुन्हा सुरू झाली आहे. त्याआधी ही वाहतूक सोमवारी मध्यरात्रीपासून पर्यायी विविध मार्गांनी सुरू होती.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर हातखंबा येथे सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास एलपीजी वाहक टँकर दलित कोसळून अपघात झाला होता. वायु भरती झाल्याने खबरदारीचे उपायोजना म्हणून मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्ग सुरू ठेवण्यात आली होती. असे असले तरी अवजड वाहनांच्या महामार्गावर भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.
दरम्यान, मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास स्थानिक प्रशासनाने हातखंबा येथे दरीत कोसळलेल्या टँकर मधील लिक्विड पेट्रोलियम गॅस अन्य टँकर मध्ये सुरक्षितपणे भरल्यानंतर मंगळवारी दुपारी दोन ते सव्वादोन वाहिनीच्या सुमारास महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली.