मुंबई जालना वंदे भारत एक्सप्रेसचा आज शुभारंभ ; १ जानेवारीपासून नियमित सेवा
![](https://ratnagirilive.in/wp-content/uploads/2023/12/images-78-554x470.jpeg)
मध्य रेल्वेवर सहावी वंदे भारत ट्रेन सेवा
मुंबई : पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी, दि. ३०.१२.२०२३ रोजी मुंबई-जालना वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सेवेच्या (व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे) उद्घाटनाच्या सोहोळ्याला हिरवा झेंडा दाखवतील. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची नियमित सेवेची सुरुवात दि. 1 जानेवारी 2024 पासून सुरू होत आहे आहे
मुंबई-जालना वंदे भारत एक्सप्रेस
गाडी क्रमांक २०७०६ मुंबई-जालना वंदे भारत एक्सप्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दि. ०१.०१.२०२४ पासून दररोज (बुधवार वगळता) १३.१० वाजता सुटेल आणि खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार त्याच दिवशी २०.३० वाजता जालना येथे पोहोचेल.
स्थानके – आगमन/निर्गमन
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – —/१३.१० वाजता
दादर – १३.१७ वाजता / १३.१९ वाजता
ठाणे – १३.४० वाजता/१३.४२ वाजता
कल्याण जंक्शन – १४.०४ वाजता / 1४.०६ वाजता
नाशिक रोड – १६.२८ वाजता/१६.३० वाजता
मनमाड जंक्शन – १७.३० वाजता / १७.३२ वाजता
औरंगाबाद – १९.०८ वाजता / १९.१० वाजता
जालना – —/२०.३० वाजता
गाडी क्रमांक २०७०५ जालना-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस जालना, दि. ०२.०१.२०२४ पासून दररोज (बुधवार वगळता) ०५.०५ वाजता सुटेल आणि खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार त्याच दिवशी ११.५५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.
स्थानके – आगमन/निर्गमन
जालना —-/०५.०५ वाजता
औरंगाबाद – ०५.४८ वाजता/०५.५० वाजता
मनमाड जंक्शन – ०७.४० वाजता/०७.४२ तास
नाशिक रोड – ०८.३८ वाजता/०८.४० वाजता
कल्याण जंक्शन – १०.५५ वाजता/१०.५७ वाजता
ठाणे – ११.१० वाजता/११.१२ वाजता
दादर – ११.३२ वाजता / ११.३४ वाजता
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – ११.५५ वाजता/–
थांबे: दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड आणि औरंगाबाद
नव्याने सुरू होत असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसची १ वातानुकूलित एक्झिक्युटिव्ह क्लास आणि ७ वातानुकूलित चेअर कार अशी कोच रचना असेल.