ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराष्ट्रीयरेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हललोकल न्यूज
मुंबई CSMT प्लॅटफॉर्म क्र. १२ आणि १३ च्या कामामुळे काही गाड्या ठाणे आणि दादरपर्यंतच धावणार!

रत्नागिरी, १६ एप्रिल २०२५: मध्य रेल्वेने मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथील प्लॅटफॉर्म क्रमांक १२ आणि १३ च्या विस्तारीकरणाच्या कामामुळे काही गाड्यांच्या मार्गात बदल केला आहे. या कामामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या तीन एक्सप्रेस गाड्या या आता दिनांक ३०/०४/२०२५ पर्यंत ठाणे आणि दादर स्थानकांपर्यंतच धावणार आहेत.
बदल झालेल्या गाड्या :
- गाडी क्रमांक १२१३४: मंगळूर जंक्शन – मुंबई CSMT एक्सप्रेस आता ठाणे स्थानकापर्यंतच धावेल.
- गाडी क्रमांक २२१२०: मडगाव जंक्शन – मुंबई CSMT तेजस एक्सप्रेस आता दादर स्थानकापर्यंतच धावेल.
- गाडी क्रमांक १२०५२: मडगाव जंक्शन – मुंबई CSMT जनशताब्दी एक्सप्रेस आता दादर स्थानकापर्यंतच धावेल.
मुंबई CSMT येथे प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम सुरू असल्याने प्रवाशांना येत्या 30 एप्रिलपर्यंत गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. - अधिक माहितीसाठी रेल्वे प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या किंवा रेल्वेच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा.





