मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर रत्नागिरीत भाजपचा जल्लोष
- भाजपच्या वतीने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाचा शपथग्रहण कार्यक्रमाचे भाजप कार्यालय रत्नागिरी येथे थेट प्रक्षेपण
- विजयी रॅली काढत ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत भाजपाच्या वतीने करण्यात आला जल्लोष
रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाचा शपथ ग्रहण कार्यक्रम रत्नागिरी भाजपा जिल्हा कार्यालय येथे थेट प्रक्षेपण करून जल्लोष साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम रत्नागिरी उत्तर मंडल, रत्नागिरी दक्षिण मंडल व रत्नागिरी शहर मंडल या तीनही मंडलाचा मिळून एकत्रित असा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालय येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. देवेंद्रजी फडणवीस यांनी शपथ घेताच कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात ठेका धरला. शहराध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी उत्स्फूर्तपणे ढोल वाजवून आपला आनंद व्यक्त केला. महिलांनी फुगड्या घालून, ढोल ताशांच्या गजरात नाचून, फटाक्यांचे आतषबाजी करत भाजप कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.
भाजप कार्यालय पासून श्री राम मंदिर ते विठ्ठल मंदिर आणि पुन्हा भाजप कार्यालय अशी उत्स्फूर्तपणे भव्य रॅली काढत, देवेंद्रजी फडणवीस आगे बढो हम तुम्हारे साथ है, महाराष्ट्र का नेता कैसा हो देवेंद्रजी फडणवीस जैसा हो, जय श्रीराम, भारत माता की जय च्या घोषणा देत रॅली काढण्यात आली. तसेच नागरिकांना लाडू आणि पेढे वाटून तोंड गोड करत उत्साहाने रॅलीची सांगता भाजप कार्यालय येथे करण्यात आली.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष दादा दळी, तालुका अध्यक्ष विवेक सुर्वे, शहराध्यक्ष राजेंद्र फाळके, महिला जिल्हाध्यक्ष वर्षाताई ढेकणे, मोर्चा,तालुका सरचिटणीस सुशांत पाटकर, उमेश देसाई, महेश खानविलकर, शहर सरचिटणीस मंदार मयेकर, मंदार खंडकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत डिंगणकर, सरचिटणीस सतेज नलावडे ,कामगार मोर्चा चे संतोष बोरकर, दादा ढेकणे, आदी प्रकोष्ठ, आघाड्या, सेल यांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.