पत्रकारांनी सामान्यांचा आवाज बनून निर्भीडपणे काम करावे : ना. योगेश कदम

दापोली : सर्वसामान्य नागरिकांसाठी, शेवटच्या व्यक्तीचा आवाज बनून पत्रकार बांधवांनी निर्भीडपणे काम करावे, अशी अपेक्षा गृहराज्यमंत्री (शहरी) योगेश कदम यांनी व्यक्त केली.
मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून सोमवारी ना. कदम दापोली दौऱ्यावर असताना ‘दापोली तालुका मराठी पत्रकार परिषद’ आयोजित पत्रकार दिवस कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आणि मान्यवरांना संबोधित केले.

‘दर्पणकार’ बाळशास्त्री जांभेकर यांनी एकोणिसाव्या शतकात तमाम मराठी बांधवांच्या आवाजाला वाचा फोडण्याचे काम केले याचीच आठवण ठेऊन आज ‘पत्रकार दिवस’ साजरा करण्यात येतो, असे त्यांनी सांगितले. यावेळी दापोली तालुक्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला.
सर्वसामान्य नागरिकांसाठी, शेवटच्या व्यक्तीचा आवाज बनून पत्रकार बांधवांनी निर्भीडपणे काम करावे अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली, सोबतच शासनाच्या वतीने मंत्री म्हणून शक्य ते सर्व सहकार्य करण्याची भूमिकादेखील ना. योगेश कदम यांनी यावेळी मांडली.