मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा रत्नागिरीत आज औपचारिक शुभारंभ
![](https://ratnagirilive.in/wp-content/uploads/2024/07/img-20240702-wa00307183757275654365809-719x470.jpg)
- पालकमंत्री उदय सामंत आज जिल्हा दौऱ्यावर
रत्नागिरी : राज्याचे उद्योगमंत्री त रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत आज मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा औपचारिक शुभारंभ करण्यात येणार आहे. शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार 6 जुलै 2024 रोजी सकाळी 6 वाजता कोकणकन्या एक्सप्रेसने रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 6.15 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी 10 वाजता सी.एस.आर संदर्भात चर्चा. (स्थळ : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, विश्रामगृह). सकाळी 10.30 वाजता उद्योग विभाग चर्चा (स्थळ : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, विश्रामगृह) सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर, नाट्यगृह, रत्नागिरी)दुपारी 12 वाजता पक्षप्रवेश कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : गोकुळ हॉल, सुनिल भोंगळे यांच्या घराशेजारी, 80 फुटी हायवे, खालची आळी, रत्नागिरी). दुपारी सोईनुसार रत्नागिरी येथून मुंबईकडे प्रयाण.