मुख्यमंत्र्यांच्या ३० रोजीच्या रत्नागिरी दौरा नियोजनाचा पालकमंत्र्यांकडून आढावा
रत्नागिरी, दि.26 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 30 नोव्हेंबर रोजी जिल्हा दौरावर येत असून, खेड लोटे एम.आय.डी. सी. मध्ये सुरु होणाऱ्या कोका कोला कंपनीचे भूमिपूजन व रत्नागिरी येथील वैद्यकीय महाविद्यालयाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या दौरा कार्यक्रमाची पूर्वतयारी म्हणून उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी संबंधित यंत्रणेचा दूरदृश्यप्रणालीद्वारे आज आढावा घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई, जिल्हा शल्य चिकित्सक डाॕ संघमित्रा फुले, खेड तहसीलदार सुधीर सोनवणे, विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच विविध महाविद्यालयीन शैक्षणिक संस्थांचे अध्यक्ष/प्रतिनिधी व प्राचार्यउपस्थित होते.
पालकमंत्री मंत्री श्री. सामंत यांनी नमो शेतकरी अभियान, नमो आत्मनिर्भय अभियान, नमो दलित सन्मान अभियान, नमो ग्राम सचिवालय अभियान, नमो स्मार्ट शाळा अभियान, नमो दिव्यांग शक्ती अभियान, नमो घरकुल अभियान, नमो क्रीडांगण उद्यान अभियान, आदी योजनांचा आढावाही यावेळी घेतला.