मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी बाल महोत्सव

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस एस गोसावी यांचे प्रतिपादन
रत्नागिरी : मुलांचा केवळ बौध्दिक विकास करुन चालणार नाही, तर त्याबरोबरच शारीरिक मानसिक विकासासाठी त्यांच्यामधील कला, क्रीडा, कौशल्य अशा सुप्त गुणांना वाव बाल महोत्सवाच्या माध्यमातून शासनामार्फत दरवर्षी केला जातो. या बाल महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबाबत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी आभार मानले.
मुलांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी त्याचबरोबर त्यांचा बौद्धिक, शारीरिक, मानसिक असा सर्वांगीण विकास करण्यासाठी जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सवाचे 3 जानेवारी ते 5 जानेवारी या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम येथे आयोजन करण्यात आले होते. रविवार दि. 5 जानेवारी रोजी पार पडलेल्या महोत्सवामध्ये प्राविण्य मिळविलेल्या मुला- मुलीचे बक्षिस वितरण सोहळा संपन्न झाला.
यावेळी जिल्हा न्यायाधीश 1 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एम. अंबाळकर, दिवाणी न्यायदंडाधिकारी, वरिष्ठ स्तर आर. एम. सातव, मुख्य न्यायदंडाधिकारी एन. जो. गोसावी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एम. आर. सातव, शासकीय मनोरुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. संघमित्रा फुले, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त डी. आर. शिंदे, राज्य कर अधिकारी ए.डी. धाडगे, बाल न्याय मंडळ सदस्य अँड विनया घाग, बाल कल्याण समिती सदस्य शिरीष दामले, ॲड रजनी सरदेसाई आदी उपस्थित होते.
मुख्य न्यायदंडाधिकारी श्री.गोसावी, यांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकरी श्री. हावळे यांनी केलेल्या प्रयत्नातून अधिकारी / कर्मचारी घडविलेबाबत गौरव उद्गार काढले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव श्री. सातव यांनी संस्थेतील प्रवेशितांना लागणाऱ्या सर्व सोयी सुविधा पुरविण्या संदर्भात सहकार्य करण्याची ग्वाही दिली. राज्य कर अधिकारी श्री. धाडगे यांनी संस्थेतील मुलांनी शिक्षण घेवून स्पर्धा परिक्षेची तयारी करून केंद्र शासन व राज्य शासन मध्ये वरिष्ठ अधिकारी पदावरती प्रयत्न करावे असे सांगितले.
प्रास्ताविकामध्ये श्री. हावळे म्हणाले, जिल्ह्यातील बाल कल्याण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शासकीय स्वयंसेवी संस्थांमध्ये पुर्नवसनासाठी दाखल झालेल्या अनाथ, निराधार उन्मार्गी मुलांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्यात एकमेकांमध्ये बंधुभाव, सांघिक भावना व नेतृत्व गुण निर्माण होण्याच्या दृष्टीने दरवर्षी चाचा नेहरु बाल महोत्सव आयोजित केला जातो. या बाल महोत्सवामध्ये 500 मुला-मुलीनी सहभाग घेतला होता. क्रिकेट, खो खो, कबड्डी अशा क्रीडा प्रकाराबरोबरचे निबंध, चित्रकला, सामुहिक गायन, नाटिका अशा सांस्कृतिक स्पर्धेत प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने विजेत्यांना बक्षिस वितरण करण्यात येणार असल्याचे सांगितले.
जिल्हा परिविक्षा अधिकारी अतिश शिंदे यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अॅड. योगेंद्र सातपुते यांनी केले.
योवळी जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथील पुरवठा निरीक्षक वागेश्वरी रेड्डी, रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक अभय तेली, तसेच ऋषिकेश धनावडे व ऋतिक बागूल आयटीआय कोर्स पूर्ण करुन बालगृह व निरीक्षणगृहातून 18वर्ष पूर्ण होवून शिक्षण घेतलेल्या शासकीय अधिकारी व खासगी नोकरी करण्याच्या यशस्वी मुला-मुलींचा सत्कार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले.