कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या जबलपूर-कोईमतूर एक्सप्रेसच्या फेऱ्या डिसेंबर अखेरपर्यंत वाढवल्या

रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरीसह कणकवली, कुडाळला थांबे
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणारी जबलपूर-कोईमतुर एक्सप्रेस ते कोईमतुर जंक्शन ही लांब पल्ल्याची गाडी आता डिसेंबर अखेर 2024 अखेरपर्यंत या मार्गावरून धावणार आहे.
मागील वर्ष दीड वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून जबलपूर एक्सप्रेस ते कोईमतुर लांब पल्ल्याची गाडी कोकण रेल्वे मार्गावरून धावत आहे. विशेष गाडी म्हणून ही गाडी चालवली जात आहे. मात्र या गाडीला लाभत असलेल्या प्रतिसाद लक्षात घेऊन या गाडीच्या फेऱ्या आता डिसेंबर अखेरपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. यासाठी कोकण रेल्वे या गाडीचे पावसाळी यातील तसेच पावसाळ्याव्यतिरिक्तच्या कलावधीसाठी वेळापत्रक देखील जाहीर केले आहे. कोकण रेल्वे मार्ग धावरी ही गाडी 02198 / 02197 या क्रमांकानी चालवली जाते.
जबलपूर-कोईमतूर एक्सप्रेसचे थांबे
नरसिंहपूर, गाडरवारा, पिपरिया, इटारसी जंक्शन, हरदा, खंडवा, भुसावळ जंक्शन, नाशिक रोड, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थिवी, मडगाव जंक्शन, कारवार, कुमटा, मूकांबिका रोड बायंदूर, कुंदापूर, उडुपी, मुळकी, मंगळुरू जंक्शन, कासरगोड, कन्नूर, वडकरा, कोझिकोड, तिरूर, शोरनूर जंक्शन आणि पालघाट.
एकूण २४ डब्यांच्या गाडीची रचना अशी आहे
- फर्स्ट एसी: १ डबा
- दोन टियर एसी: २ डबे
- तीन टियर एसी: ६ डबे
- स्लीपर: ११ डबे
- जनरल: २ डबे
- एसएलआर: २ डबे
भुसावळ नाशिक थांबे घेत गाडी पनवेल मार्गे कोकण रेल्वे मार्गावर आल्यानंतर तिचे वेळापत्रक याप्रमाणे ⬇️⬇️
