मोलमजुरी करणाऱ्या बापाने दोन्ही दिव्यांग मुलांना बनवले संगणक पदवीधर!
लांजा : “श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकासाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी”… दोन्ही मुले जन्मताच दिव्यांग प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जिद्द आणि शिकण्याची ओढ कष्ट आणि मोलमजुरी करून दोन्ही मुलांचा बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यांना संगणकीय पदवी देऊन सक्षम करण्याचें अलौकिक काम लांजा तालुक्यातील सालपे या गावातील प्रमोद अनंत घाग या बापाने केले आहे.
शिक्षणाचे महत्त्व जाणलेल्या कुटुंबाचे ही एक प्रेरणादायी आणि दर्दभरी कहाणी आहे. एका श्रमलेल्या बापाची यात जिद्द दिसते. त्याना दोन दिव्यांग मुलांची तसेच तेवढीच साथ लाभली आहे त्यांच्या आईचीही.
लांजा तालुक्यात पूर्व भागातील दुर्गम असे सालपे गाव. या गावात प्रमोद घाग पत्नी आणि दोन दिव्यांग मूले ओमकार वय 21आणि शुभम व 18 अतिशय गरीब आणि खडतर जीवन मोलमजुरी करून हे कुटुंब आपली गुजराण करत आहे. दारिद्ररेषेखाली असलेले हे कुटुंब आजही प्रतिकूल परिस्थितीत जीवन संघर्ष करत आहे. अपंग असलेल्या दोन्ही मुलांचे प्राथमिक शिक्षण गावातच पूर्ण केले. वडील प्रमोद घाग या दोन्ही मुलांना पहिलीपासून ते बारावीपर्यंत त्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांच्या सावलीप्रमाणे मागे उभे होते.
प्राथमिक शिक्षण घेत असतानाच दोन्ही मुलांना अपंग दाखले घेऊन तीनचाकी सायकल शिक्षण विभागाकडून मिळाल्या होत्या बापाचा आधार आणि या तीन चाकी सायकल घेऊनच या दोन मुलांनी शिक्षणाची जिद्द ठेवली प्रत्येक आई-वडिलांना बापाला आपलं मूल शिकावं मोठे व्हावं, चांगले नोकरी करून ही प्रत्येक बापाची महत्त्वाकांक्षा असते ओमकार आणि शुभम यांनी आपल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिक्षणाची जिद्द मनात बाळगली. आई मोलमजुरी करत होती आणि बाप मुलांना शाळेत सोडण्याचे आणण्याचे काम करत असे. या दोन्ही दिव्यांग मुलांचे माध्यमिक शिक्षण शिपोशी तालुका लांजा येथील हायस्कूलमध्ये झाले. बारावी बारावी परीक्षेत चांगले यश या दोन्ही मुलांनी संपादन केले बाबा आम्हाला संगणक शिकायचे आहे ही ही जिद्द बोलून दाखवली. बाबा प्रमोद घाग यांनी या दोन्ही मुलांना संगणक ट्रेनिंग लांजा शहरात देऊन हे ट्रेनिंग पूर्ण केले. दररोज या दोन्ही मुलांना एसटी बसने सालपे ते लांजा असा प्रवास केला दोन्ही मुलांना संगणकीय शिक्षण दिले.
दिव्यांगांसाठीच्या योजनेतून या दोन्ही मुलांना प्रत्येकी 1500 रुपये मानधन मिळते. या दोन्ही मुलांच्या मानधनावरच या कुटुंबाचा चरितार्थ चालतो. प्रमोद घाग यांच्या जिद्दीला सलाम आणि दोन्ही मुलांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.
(प्रमोद घाग, संपर्क क्रमांक 9405597895, 8275652491)