जगाच्या पाठीवरब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराष्ट्रीयस्पोर्ट्स

रत्नागिरीच्या अविराज गावडे याने कौंटी क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामनाही गाजवला!

  • जोरदार फलंदाजीच्या जोरावर केली नाबाद शतकी खेळी

रत्नागिरी : रत्नागिरीचा युवा क्रिकेटपटू अविराज अनिल गावडे याने इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या कौंटी स्पर्धेत शेवटचा सामना गाजवला. अविराज गावडेने नाबाद शतकी खेळी करत कौंटी स्पर्धेत सहाव्यांदा मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला व आपल्या भरीव कामगिरीने संघाला विजय मिळवून दिला.


शनिवारी झालेल्या शेवटच्या सामन्यामध्ये रिजेंटस् पार्क संघाविरुद्धच्या सामन्यामध्ये अविराज गावडे खेळत असलेल्या मिडलसेक्स पेशवा संघाने ४५ ओव्हर्समध्ये २५६ रन्सचा स्कोअर उभारला. या सामन्यामध्ये अविराज याने आपल्या फलंदाजीची चुणूक दाखवत नाबाद ११० धावा ठोकल्या.
अविराज ९८.२१ च्या स्ट्राइक रेटने ११२ बॉलमध्ये ११० रन्स करत नाबाद राहीला. त्यामध्ये त्याच्या अकरा चौकारांचा समावेश होता. अविराज याने याआधीही कौंटी स्पर्धेत गोलंदाजी व फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली होती. मात्र त्याने शेवटच्या सामन्यात खेळताना शतक ठोकून आपल्या खेळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या सामन्यात प्रत्युत्तरादाखल रिजेंट्स पार्क संघाला सर्व बाद १४६ धावा करता आल्या, अविराज याने ५ षटके टाकत १ बळी घेतला.

अविराजच्या ऑल राऊंडर कामगिरीमुळे या मॅचमध्ये त्याला मॅन ऑफ दी मॅचचा किताब बहाल करण्यात आला. अविराजचा याचा हा सहावा सामनावीर किताब आहे. अविराज याला इंग्लंडमध्ये मिडलसेक्स संघाकडून कौंटी स्पर्धेत खेळण्यासाठी चार महिन्यासाठी करारबद्ध करण्यात आले होते. अविराज गावडे आता 11 सप्टेंबरला भारतात परतत आहे. मात्र गेल्या अनेक सामन्यातून त्याने लक्षणीय कामगिरी करत इंग्लंडमध्ये आपल्या खेळाची छाप पाडत लक्ष वेधून घेतले होते.

इंग्लंडमधील खेळपट्टीवर देखील त्याने आपल्या फिरकीच्या जादूच्या जोरावर अनेक विकेटसही घेतल्या होत्या. अविराज याच्या लक्षणीय कामगिरीमुळे आता पुढील मोसमाकरिता त्याला इंग्लंडमधील विविध नामवंत क्लबमधून खेळण्यासाठी ऑफर आल्या आहेत. रत्नागिरीचा युवा क्रिकेटपटू अविराज गावडे याने इंग्लंडमध्ये कौंटी सामन्यात आपल्या कामगिरीने छाप पाडल्याने त्याचे सर्व रत्नागिरीकरांच्यावतीने व क्रिकेटप्रेमींच्यावतीने अभिनंदन करण्यात येत आहे.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button