क्राईम कॉर्नरब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्स

रत्नागिरीच्या मिऱ्या किनाऱ्यावर मृत ‘देव माशा’चे अवशेष आढळले

रत्नागिरी, महाराष्ट्र: रत्नागिरी शहरानजीक असलेल्या मिऱ्या समुद्रकिनारी (Mirya Beach Ratnagiri) एक  मृत देव माशाचे (Whale Carcass) अवशेष आढळून आले आहेत.

काय आहे नेमकी घटना?

स्थानिक रहिवाशांना मिऱ्या किनारी तीव्र कुजकट वास (bad smell) येत असल्याने त्यांनी किनाऱ्याची पाहणी केली. तेव्हा त्यांना पाण्यामध्ये आणि किनाऱ्यावर अत्यंत मोठ्या आकाराच्या मृत झालेल्या एका देव माशाचे (Whale) अवशेष आढळून आले. हा देव मासा कधी मृत झाला आणि तो किनाऱ्यावर कसा आला, याबद्दल अधिक माहिती मिळू शकलेली नाही.

समुद्री जीव धोक्यात?

यापूर्वी देखील रत्नागिरी (Ratnagiri News), मालगुंड आणि गणपतीपुळे (Ganpatipule) यांसारख्या कोकण किनारपट्टीवरील अनेक महत्त्वाच्या समुद्रकिनाऱ्यांवर मृत समुद्री जीवांचे अवशेष आढळले आहेत. वारंवार अशा घटना घडत असल्याने, कोकण किनारपट्टीवरील समुद्री पर्यावरणाचे आणि समुद्री जीवांचे (Marine Life) आरोग्य धोक्यात आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button