महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्स
रत्नागिरीच्या समुद्रकिनार्यावर आढळला ४० फुटी मृतावस्थेतील व्हेल!
रत्नागिरी : रत्नागिरीतील मांडवी समुद्रकिनार्यावर शनिवारी सायंकाळच्या सुमारास मृतावस्थेतील एक व्हेल मासा आढळून आला. हा मासा जवळपास ४० फूट लांबीचा आहे.
समुद्रात काही दिवसापूर्वी या माशाचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लाटांमुळे हा मृत मासा शनिवारी मांडवी समुद्रकिनाऱ्याला लागला. माशाचा नेमका कशामुळे मृत्यू झाला, हे समजू शकलेले नाही. शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.
शनिवारी सायंकाळी मांडवी किनाऱ्यावर मृता व्हेल मासा आढळल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी वन विभागाला व पोलिस यंत्रणेला दिली.