उद्योग जगतब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज
रत्नागिरीतील निरामय योगाच्या विरू स्वामींना महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार प्रदान

रत्नागिरी : निरामय योगा क्लासेसने सर्वोत्कृष्ट योगा क्लासेसचे नामांकन पटकावून विरू स्वामी यांनी महाराष्ट्र उद्योग रत्न पुरस्कार २०२५ पटकावला.
रत्नागिरीतील नामांकित योगसंस्था निरामय योग संस्था आणि या योगसंस्थेचे सर्वेसर्वा योगगुरू श्री. विरू स्वामी सर यांना नुकतेच नाशिक येथील एका भव्य कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र उद्योग रत्न पुरस्कार २०२५ हा Reseal.in तर्फे दिला जाणारा मानाचा पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
योग क्षेत्रात करित असलेल्या भरीव कार्याची दखल घेत अभिनेत्री तेजस्विनी पंडीत यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.