ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराजकीयलोकल न्यूज
रत्नागिरीतील मिऱ्या बंधारा लवकरच नागरिकांसाठी खुला

रत्नागिरी : शहरालगतच्या मिऱ्या बंधाऱ्याच्या सुरू असलेल्या कामांची जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी पाणी केली. हा बंधारा लवकरच नागरिकांसाठी खुला करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.
बुधवारी रत्नागिरी दौऱ्यावर असताना जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पांढरा समुद्र मिऱ्या ब येथील धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची पाहणी केली. या ठिकाणी सुरू असलेल्या कामांची माहिती घेतली आणि संबंधित अधिकाऱ्यांना बंधाऱ्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
हा बंधारा परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, तो जनतेसाठी लवकरच खुला करण्यात येणार आहे. रत्नागिरीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या सुविधेसाठी आम्ही कटिबद्ध यावेळी पालकमंत्र्यांनी सांगितले.