रत्नागिरीतील युवा तायक्वांदोच्या ११ खेळाडूंची राज्यस्तरावर भरारी!
चंद्रपूर येथे १८ जुलैपासून होणाऱ्या स्पर्धेसाठी जिल्हा संघात निवड
रत्नागिरी : तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्यावतीने दिनांक 18 19 20 जुलै 2024 रोजी चंद्रपूर येथे राज्यस्तरीय कॅडेट तायक्वांदो स्पर्धा आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा संघचा समावेश आहे. या संघामध्ये रत्नागिरी तालुक्यातील युवा मार्शल तायक्वांदो ट्रेनिंग सेंटर साळवी स्टॉप ओम साई मित्र मंडळ सभागृह येथे सुरू असलेल्या प्रशिक्षण केंद्रातील अकरा खेळाडूंची निवड राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी झाली आहे.
चंद्रपूर येथे होणाऱ्या कॅडेट तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झालेले खेळाडू
क्योरोगी
1) उपर्जना राम कररा
- 2) भार्गवी सत्यविजय पवार
- 3 ) ओम अभिजित सागवेकर
- 5) पियुष आर जाधव
-
पुमसे
- वैयक्तिक
- 1) रुद्दी मधुर धुळप
- जोडी
- 2) भार्गवी सत्यविजय पवार
- योगराज सत्यविजय पवार
- संघ
- 1) भार्गवी सत्यविजय पवार
- 2) नुपूर निलेश दप्तरदार
- 3) उपर्जना राम कररा
- संघ मुले
- 1)योगराज सत्यविजय पवार
- 2)वेदांत संतोष देसाई
- 3) अर्णव हेमराज निर्मल
- फ्री स्टाईल संघ
- 1 1)स्वरा हर्षल तेरवणकर
- 2) निलाक्षी राजेश राहठे
- 3) वेदांत संतोष देसाई
- 4) नूपूर निलेश दप्तरदार
- 5) योगराज सत्यविजय पावर
वरील सर्व खेळाडूंना रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन अध्यक्ष श्री. वेंकटेश्वर राव कररा उपाध्यक्ष श्री शैलेश गायकवाड श्री. विश्वदास लोखंडे
सचिव श्री लक्ष्मण कररा कोषाध्यक्ष श्री शशांक घडशी सर्व पदाधिकारी तसेच कै अन्नपूर्णा प्रभू संगीत कला विद्यालय चे अध्यक्ष अनंतजी आगाशे युवा मार्शल टायकोंडो ट्रेनिंग सेंटर चे सर्व पदाधिकारी पालक. प्रशिक्षक यांनी अभिनंदन केले विजेते सर्व खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक राम कर रा सहप्रशिक्षक प्रतीक पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या जिल्हा संघाचे संघ प्रशिक्षक म्हणून युवा अकॅडमी चे प्रशिक्षक अमित जाधव महिला प्रशिक्षिका सौ. शशी रेखा कररा यांची निवड करण्यात आली आहे. यशस्वी सर्व खेळाडू व प्रशिक्षक याचे जिल्हाभरातून अभिनंदन होत आहे.