उद्योग जगतब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज
रत्नागिरीतील राई बंदरात उद्या हाऊस बोटीचे लोकार्पण

- कोकणातील जल पर्यटनाला मिळणार चालना
रत्नागिरी : जिल्हा परिषद रत्नागिरीमार्फत सिंधू रत्न योजनेअंतर्गत हाऊस बोट प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा उद्या, २० फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी २.३० वाजता होणार आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.
गुहागर, रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यांच्या सीमावर्ती राई भातगाव खाडीत या हाऊस बोटीमधून पर्यटकांना जलसफरीचा आनंद लुटता येणार आहे. या उपक्रमामुळे स्थानिक जल पर्यटनाला मोठी चालना मिळेल.