महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजशिक्षण

रत्नागिरीतील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विदयापीठ, दापोली अंतर्गत सध्या ‘झाडगाव, रत्नागिरी येथे असलेल्या ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचा वर्धापन दिन दरवर्षी दिनांक ११ नोव्हेंबर रोजी संशोधन केंद्रा मार्फत साजरा केला जातो. या वर्षी संशोधन केंद्राचा वर्धापन दिन ‘निलम महोत्सव’ म्हणून उत्साहामध्ये साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाला डॉ. बा.सा. कोंकण कृषि विद्यापीठ, दापोलीचे आदरणीय कुलगुरू मा. डॉ. संजय भावे उपस्थित होते. त्याचबरोबर डॉ. पी.ई. शिनगारे, सहयोगी अधिष्ठाता, मत्स्य महाविद्यालय, शिरगाव; सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. सुरेश नाईक; मत्स्य अभियांत्रिकी पदविका विद्यालय, शिरगावचे प्राचार्य डॉ. आशिष मोहिते आणि सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे डॉ. आसिफ पागरकर उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर संशोधन केद्राचे माजी संशोधन अधिकारी डॉ. शेखर कोवळे व डॉ. विजय निंबाळकर हे मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचा शुभारंभ वरील मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून आणि डॉ. बाळासाहेब सावंत यांची प्रतिमा पूजन करून पार पडला. त्यानंतर महाराष्ट्र गीत आणि डॉ. बा.सा. कोंकण कृषि विद्यापीठाचे गीत वादन करण्यात आले.

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी व प्रमुख डॉ. सुरेश नाईक यांनी या कार्यक्रमाची प्रस्तावना करताना संशोधन केंद्राचा इतिहास, सद्यस्थिती आणि संशोधन केंद्राचा संशोधन आढावा सादर केला. माजी कर्मचाऱ्याचे अनुभव शिदोरीचा नविन पिढीला लाभ व्हावा म्हणून त्यांच्या कल्पनेतून सदर आजी-माजी कर्मचाऱ्यांचा स्नेह-संमेलन मेळावा आयोजित करण्यात आला.
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे निवृत्त माजी संशोधक डॉ. व्ही.डी. निंबाळकर यांनी केलेल्या सागरी संशोधन कार्याच्या आठवणीना उजाळा दिला. तसेच सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे माजी संशोधन अधिकारी आणि मत्स्य महाविद्यालय, शिरगावचे निवृत्त सहयोगी अधिष्ठाता डॉ. शेखर कोवळे आपले अनुभव कथन करताना सर्वांनी एकमेकांबरोबर काम करीत असताना आपले मैत्रीचे नाते दृढ ठेवणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.
डॉ. प्रकाश शिनगारे, सहयोगी अधिष्ठाता, मत्स्य महाविद्यालाय व माजी वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी यांनी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राने केलेले संशोधन कार्य आंतरराष्ट्रीय स्तरावर सिद्ध झाले आहे त्याबद्दल प्रशंसा केली. तरी या संशोधन केंद्राला अधिकृतपणे प्रादेशिक मत्स्य संशोधन केंद्राचा दर्जा आणि नाव प्राप्त व्हावे तसेच या संशोधन केंद्रामध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुद्धा सुरु व्हावे अशी आशा व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. संजय भावे, मा. कुलगुरू, डॉ.बा.सा. कोंकण कृषि विद्यापीठ, दापोली यांनी संशोधन केंद्र आणि मत्स्यविद्या शाखेने केलेल्या कार्याची प्रशंसा केली. तसेच त्यांनी मुख्यमंत्री संशोधन निधी अंतर्गत या संशोधन केंद्राला निधी मिळवून देण्याचा पर्यंत केला जाईल असे सांगितले. कोंकण विकासाच्या दृष्टीने संशोधक आणि विस्तार शिक्षण कार्यकर्ते म्हणून आपण शेतकऱ्यांना कशा प्रकारे उपयोगी पडतो, त्यांचे उत्पादन वाढविण्याकरिता नविन शेती पूरक व्यवसायाच्या संधी निर्माण करून देणे महत्वाचे असल्याचे त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणामध्ये मत व्यक्त केले.

या कार्यक्रम प्रसंगी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राच्या ६५ वर्षातील विविध कार्याचे चित्रफितीद्वारे सादरीकरण करून जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. तसेच येथे कार्यरत व उपस्थित सर्व आजी व माजी कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. या वेळी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राच्या ६५ वर्षातील कार्यावर संशोधन केंद्रातील लिपिक श्री. सचिन पावसकर यांनी स्वलिखित गीत झाकडी लोक-नृत्याच्या चालीवर सादर केले. या गीताची सर्वानीच प्रशंसा केली. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. सचिन साटम, सहाय्यक संशोधन अधिकारी यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. अपुर्वा सावंत, वरिष्ठ संशोधन सहाय्यक यांनी केले.
यावेळी उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी यांना स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते. दुपारच्या सत्रामध्ये कर्मचाऱ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यामध्ये डॉ. शेखर कोवळे, श्री. एकनाथ पंडये, श्रीम. जाई साळवी, श्रीम. अपुर्वा सावंत, श्रीम. वर्षा सदावर्ते, श्री. दिनेश कुबल, श्री. स्वप्नील आलीम, श्री. महेश किल्लेकर (ढोलकी वादक), श्री. मंगेश नांदगावकर (घुंगरू वादक), श्री. मनिष शिंदे (प्रकाश योजना), डॉ. हरीश धमगाये (ध्वनी व्यवस्था), तसेच कुमारी जिविका किल्लेकर यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमाला कृषि संशोधन केंद्र, शिरगावचे प्रमुख डॉ. विजय दळवी, नारळ संशोधन केंद्र, भाट्येचे प्रमुख डॉ. किरण माळशे, श्री. राजाराम धनावडे, सहाय्यक अभियंता, शिरगाव, श्री. विलास यादव, अधिदान व लेखा परीक्षण अधिकारी, शिरगाव, तसेच कृषि विज्ञान केंद्र, लांजाचे प्रतिनिधी श्री. वैभव येवले उपस्थित होते. तसेच मत्स्य महाविद्यालय, शिरगाव येथील विभाग प्रमुख डॉ. नितीन सावंत, डॉ. अनिल पावसे, डॉ. स्वप्नजा मोहिते, डॉ. बाळासाहेब चव्हाण व डॉ. केतन चौधरी हे सुद्धा उपस्थित होते.
या कार्यक्रम करिता सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र मधील निवृत्त माजी कर्मचारी श्रीम. गणपुले, श्री. संते, श्री. लोंढे, श्री. डोर्लेकर, श्री. बशिर सोलकर, श्री. पालशेतकर, श्री. एकनाथ पंडये, श्री. विरकुमार शेटये, श्री. विजय शिंदे, श्री. पवार, श्री. चंद्रकांत सावंत, श्री. महेश शितोळे, श्री. विनोद कुबल, श्री. सीताराम शिंदे हे उपस्थित होते. तसेच माजी कर्मचारी परंतु सध्या इतरत्र कार्यरत असणारे डॉ. बाळासाहेब चव्हाण, डॉ. अनिल पावसे, प्रा. श्रीकांत शारंगधर, प्रा. मकरंद शारंगधर, डॉ. वर्षा भाटकर, श्री. साईप्रसाद सावंत, डॉ. संगीता वासावे, डॉ. विजय मुळये, डॉ. संतोष मेतर, डॉ. मनोज घुगुस्कर, श्री. दीपक वाघ, श्री. सचिन जाधव, श्रीम. सायली कांबळे, श्री. सिद्धेश कांबळे हे उपस्थित होते. या सर्वांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजन करिता डॉ. सुरेश नाईक, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली डॉ. आसिफ पागरकर (सहयोगी संशोधन अधिकारी), डॉ. हरीश धमगाये (अभिरक्षक), प्रा. नरेंद्र चोगले व प्रा. सचिन साटम (सहाय्यक संशोधन अधिकारी), श्रीम. वर्षा सदावर्ते (जीवशास्त्रज्ञ), श्रीम. अपुर्वा सावंत (वरिष्ठ संशोधन सहाय्यक), श्री. रमेश सावर्डेकर (व. प्रयोगशाळा सहाय्यक), श्रीम. जाई साळवी (वरिष्ठ लिपिक), श्री. सचिन पावसकर (लिपिक), श्री. मंगेश नांदगावकर (तांडेल), श्री. महेश किल्लेकर (यंत्र चालक, बोट), श्री. मनिष शिंदे (मत्स्यालय यांत्रिक), श्री. दिनेश कुबल (बोटमन), श्री. राजेंद्र कडव, श्री. सुहास कांबळे, श्री. सचिन चव्हाण, श्री. प्रवीण गायकवाड, श्री. तेजस जोशी, श्री. स्वप्नील आलीम, श्री. योगेश पिलणकर, श्री. अभिजित मयेकर, श्री. उल्हास पेडणेकर व श्री. दर्शन शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रम करिता व्यासपीठ व्यवस्था श्री. नितीन सुर्वे, मुरुगवाडा कॉर्नर यांनी केली. तसेच लायटिंग, खुर्च्या, पडदे याकरिता मत्स्य महाविद्यालय आणि मत्स्य अभियांत्रिकी पदविका विद्यालय, शिरगाव यांनी मदत केली.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button