रत्नागिरी अपडेट्स
रत्नागिरीत ईद उत्साहात साजरी

रत्नागिरी : दावते इस्लामी रत्नागिरी शाखेतर्फे शनिवारी कोकणनगर येथे ईद उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच मच्छीमार्केट फैजाने रजा येथे ईद ची नमाज हाफिज अहमद रजा यांच्या हस्ते पठण करण्यात आली.
यावेळी दुवा उवेज जरीवाला यांनी केली तर कोकण नगर येथे मौलाना अशरफ यांनी नमाज पठण केली. या निमित्त झालेल्या कार्यक्रमात प्रवचन (बयान ) अल्ताफ कुरेशी यांनी केली. या कार्यक्रमानंतर उपस्थित सर्वांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
