रत्नागिरीत एसटी बसची धडक बसून महिला जखमी
![](https://ratnagirilive.in/wp-content/uploads/2023/09/img-20230918-wa00073314272974301126391.jpg)
रत्नागिरी : मारुती मंदिर ते माळनाका दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमकडे जाणाऱ्या रस्त्यासमोर एसटी बसची धडक बसून महिला जखमी झाली आहे. सोमवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास अपघात झाला.
![](http://ratnagirilive.in/wp-content/uploads/2023/09/img-20230918-wa00073314272974301126391-300x197.jpg)
रत्नागिरीतून विजापूरला जाणारी एसटी बस मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यासमोर आली असता तेथे दुभाजकातून रस्ता पार करणाऱ्या महिलेची बसला धडक झाली. या अपघातात महिला जखमी झाली आहे. अपघातात जखमी झालेली महिला घटनास्थळाच्या परिसरात राहत असल्याचे समजते. तिला तातडीने रुग्णालयात उपचारात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, सकाळी साडेआठच्या सुमारास झालेल्या या अपघातातील बस सकाळी पावणे अकरा वाजेपर्यंत घटनास्थळी उभी होती. त्यामुळे गणेशोत्सव काळात शहरातील ट्रॅफिक वाढलेले असताना अपघात झालेल्या ठिकाणी वाहन चालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले.