रत्नागिरीत निरामय योग संस्थेतर्फे जागतिक योग दिनी शिबिर
रत्नागिरी : जागतिक योग दिनानिमित्त दि. २१ जून रोजी मराठा मंडळ व निरामय योगसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने माळ नाका येथील मराठा भवन हॅालमध्ये योग शिबीर पार पडले. सकाळी सहा ते आठ या वेळेत पार पडलेल्या या शिबीरामध्ये नियोजित वेळेपूर्वीच योगप्रेमिंनी गर्दी केली होती. या शिबिराचा लाभ सुमारे एकशे एकविस योगप्रेमिंनी घेतला. शिबीराची शिस्त वाखाणण्यासारखी होती.
या शिबीरामध्ये सर्व वयोगटाच्या योगप्रेमिंनी सहभाग घेतला. निरामय योग कक्षेचे आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त योगगुरू श्री. विरू स्वामी यांनी त्यांच्या शिष्यांसह प्रात्यक्षिकांद्वारे योगाचे महत्व पटवून दिले. शिबिराचा लाभ घेतलेल्या सर्वच सहभागींनी मराठा मंडळ व निरामय योगसंस्थेचे आभार मानले . सहभागी योगप्रेमिंनी या शिबीराबाबत आपले मनोगत व्यक्त करतांना शिबिराची खूप प्रशंसा केली. दोन तासात किमान एक किलो ते तीन किलो वजन कमी झाल्याचा अनुभव शिबीरार्थींनी घेतला.
या शिबीरामध्ये मराठा मंडळचे श्री. भाऊ देसाई , श्रीम. काकी नलावडे, श्री. केशवराव इंदुलकर , सौ. अंजली इंदुलकर , वैभवी नलावडे , संजय गायकवाड आदी. मान्यवरांनी सहभाग घेतला व योगगुरू श्री. विरू स्वामी यांच्या योगकार्यास शुभेच्छा दिल्या. मराठा मंडळ तर्फे योगगूरूंचा यथोचित सत्कार करण्यात आला. निरोगी व सकारात्मक जिवनशैलीसाठी सर्वांनी नियमित योगा करावा असे आवाहन योगगूरू श्री. विरू स्वामी यांनी उपस्थितांना केले.