ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराष्ट्रीयलोकल न्यूज
रत्नागिरीत प्रजासत्ताक दिनी तिरंग्याला मानवंदना!

रत्नागिरी : भारतीय प्रजासत्ताक दिन शुक्रवारी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर उत्साहात साजरा करण्यात आला. राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालक मंत्री, उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. श्री. कीर्तीकिरण पुजार आदी उपस्थित होते.
या प्रसंगी, पोलीस अधिकारी/अंमलदार तसेच नागरिकांनी व शहरातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत राष्ट्रीय तिरंग्याला मानवंदना दिली.