रत्नागिरीनजीक भाट्ये पुलावर ओव्हरटेक करताना अपघात; दुचाकीस्वराचा मृत्यू

रत्नागिरी : पावस रत्नागिरी मार्गावर एका दुचाकीस्वाराचा भाट्ये पुलावर तेथील चेकपोस्टजवळ भीषण अपघात होऊन त्यात जागीच मृत्यू झाला. अन्य वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
याच मार्गावरून जाणाऱ्या अन्य वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना रविवारी दुचाकीस्वाराने नियंत्रण गमावले आणि तो रस्त्यावर कोसळला. महेश अनंत पिलणकर (४७, फणसोफ, टाकळीवाडी ) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.
या अपघातात दुचाकीस्वार महेश पिलणकर याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी धावले आणि त्यांनी पोलिसांना या अपघाताची माहिती दिली. अपघातामुळे भाट्ये पुलावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती.
पोलिसांनी घटनास्थळी येऊन अपघाताचा पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला.