क्राईम कॉर्नरब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज

रत्नागिरीनजीक समुद्रात एलईडी दिव्यांद्वारे मासेमारी करणाऱ्या दोन नौका पकडल्या

  • वीस लाखांची मालमत्ता मत्स्यव्यवसाय विभागाकडून जप्त

रत्नागिरी : मत्स्यव्यवसाय विभागाची गस्ती नौका रामभद्र गस्त घालत असताना 11 सागरी मैलाच्या दरम्यान एल.ई.डी. लाईट मासेमारी करणाऱ्या 2 नौका अरशद अ. लतीफ पावसकर यांची नौका “साद माज” क्र. IND-MH-4-MM-3731, आणि लियाकत मस्तान यांची नौका “सुभान सफवान” क्र. IND-MH-4-MM-998 या दोन नौका एल.ई.डी. साहित्यासह आढळून आल्या. दोन्ही नौकांसह 20 लाखांचे मालमत्ता विभागाकडून जप्त करण्यात आली.

रत्नागिरी किनारपट्टीवर परप्रांतीय मासेमारी नौका तसेच एल.ई.डी. मासेमारी नौका कार्यवाही अनुषंगाने मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी कालच मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाची आढावा बैठक घेऊन पर्ससीन व एल.ई.डी. या दोन्ही प्रकारच्या मासेमारीवर अंकुश आणण्याच्या दृष्टीने विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. या सूचनांची सक्त अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने विभागाची गस्ती नौका “रामभद्र” क्र. IND-MH-4-MM-5806 गस्ती कामी काल रात्रीच रवाना करण्यात आली.

गस्ती दरम्यान 11 सागरी मैलाचे दरम्यान एल.ई.डी. लाईट मासेमारी करणाऱ्या 2 नौका अनुक्रमे अरशद अ. लतीफ पावसकर यांची नौका “साद माज” क्र. IND-MH-4-MM-3731, आणि लियाकत मस्तान यांची नौका “सुभान सफवान” क्र. IND-MH-4-MM-998 या दोन नौका एल.ई.डी. साहित्यासह आढळून आल्या. या दोन्ही नौका आज सकाळी मिरकरवाडा बंदरात आणण्यात आल्या असून सागरी कायद्याअंतर्गत प्रतिवेदन दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. दोन्ही नौकेवरील एल.ई.डी. लाईट व जनरेटर नौकेसहीत जप्त करण्यात आले असून दोन्ही नौकेवरील एल.ई.डी. लाईट्स व जनरेटर यांची सुमारे प्रत्येकी रु. 10 लाख किंमत धरुन दोन नौकेवरील एकूण रु. 20 लाखाची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
मंत्री महोदयांच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी विभागाच्यावतीने करण्यात येत आहे. मच्छीमारांनी कोणत्याही प्रकारे अनधिकृत एल.ई.डी. लाईटचा वापर मासेमारीसाठी करु नये. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या नौकांना कठोर कारवाईस सामोरे जावे लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button