रत्नागिरीसाठी नवजात शिशु रुग्णवाहिकेसह कर्करोग निदान युनिटचे ना. सामंत यांच्या हस्ते लोकार्पण
रत्नागिरी : जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे बुधवारी नवजात शिशु रुग्णवाहिका, कर्करोग निदान उपकरणे व परिचारिका प्रशिक्षण वाहन लोकार्पण सोहळा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी ना उदय सामंत यांनी सार्वजनिक आरोग्य विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत नवजात शिशू रुग्णवाहिका, कर्करोग निदान उपकरणे, 5 रुग्णवाहिका, परिचारिका प्रशिक्षण वाहन यांचे लोकार्पण केलं.
यावेळी १५ कोटी रुपये खर्चून जिल्हा सामान्य रुग्णालय अद्यावत होत आहे. तसेच शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील ९५ डॉक्टर हे जनतेच्या सेवेत असणार असणार असल्याचं ना. सामंत यांनी सांगितलं. कोकणातील पहिली नवजात शिशू रुग्णवाहिका त्याचबरोबर कर्करोग निदान उपकरणे यांचे लोकार्पण केलं. परंतु या सुविधांचा कमीत कमी वापर व्हावा. सर्वांना निरोगी चांगले आयुष्य मिळावे, असे वक्तव्य ना. सामंत यांनी केले.
या प्रसंगी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, तहसीलदार राजाराम म्हात्रे, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित आदी उपस्थित होते.