ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराजकीयलोकल न्यूज

रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष हिराभाई बुटाला यांचे निधन


खेड  : रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खेडच्या सहजीवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हिराचंद परशुराम ऊर्फ हिराभाई बुटाला यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. नवी मुंबईतील रेवमॅक्स कंपनीचे मालक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे जवळचे स्नेही कौस्तुभ बुटाला यांचे ते वडील होत. श्री. बुटाला यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू होते. मंगळवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने सहजीवन शिक्षण संस्था परिवार दुःखात बुडाला आहे.

खेडमध्ये किराणा मालाचे व्यापारी म्हणुन त्यांनी व्यवसाय सुरू केला होता. त्यानंतर ते राजकारणात सक्रिय झाल्यावर खेड तालुका काँग्रेस चे अध्यक्ष नंतर जिल्हा कॉंग्रेसचे 1985 ते 1990 पर्यंत अध्यक्ष पद भूषविले.त्यांना प्रियदर्शनी इंदिरा गांधी पुरस्कार नवी दिल्ली येथे सन्मानपूर्वक देण्यात आला होता. त्यांचे राज्यातील अनेक जुन्या दिग्गज नेते मंडळी यांच्याशी जवळचे संबंध होते. माजी मुख्यमंत्री शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, कै.भाईसाहेब सावंत, माजी कायदा मंत्री कै. हुसेन दलवाई, माजी पंतप्रधान कै. इंदिरा गांधी,कै. राजीव गांधी यांच्याशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. खेड मधील सहजीवन शिक्षण संस्थेच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता. ते 1973 पासून आतापर्यंत सलग 52 वर्षे अध्यक्ष पदावर कार्यरत होते.

खेड तालुक्यातील अनेक सामाजिक, राजकीय व शैक्षणिक संस्था यांच्या बरोबर त्यांचे जवळीक होती. सहजीवन शिक्षण संस्थेचे श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, आय सी.एस. महाविद्यालय, हिराचंद पर्शुराम बुटाला माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय, मदनभाई सुरा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट खेड, सहजीवन प्रायमरी स्कूल, खेड या अस्थापना यामध्ये श्रध्दांजली वाहून शालेय कामकाज बंद ठेवण्यात आले होते. त्यांच्या एच. पी. बुटाला किराणा दुकान, एच. पी.बुटाला अँड सर्व्हिसेस, लक्ष्मी मसाले इंडस्ट्रीज, एचपी गॅस सर्व्हिस या अस्थापना बंद ठेवण्यात आल्या होत्या.

त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे तीन भाऊ व त्यांचे कुटुंबीय असा मोठा परिवार आहे.

हिराबाई बुटाला यांच्यावर नेरुळ येथे सायंकाळी अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी दशानेमा गुजर समाजातील समाज बांधव तसेच विविध राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मान्यवर उपस्थित होते.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button