रत्नागिरी जिल्हा शालेय तायक्वांदो स्पर्धेला प्रारंभ
चिपळूण : क्रीडा व युवक सेवा संचालन महाराष्ट्र राज्य पुणे व रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोस्सिएशन रत्नागिरी यांच्या सहकार्याने रत्नागिरी जिल्हा शालेय तायक्वांदो स्पर्धा दि. 25 , 26 ऑक्टोबर 2023 रोजी चिपळूण येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.
या शालेय स्पर्धेचे उद्घाटन राज्य क्रीडा मार्गदर्शक सचिन मांडवकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी चिपळूण तालुक्याचे सन्मान्वयक समीर कालेकर, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष वेंकटेश्वरराव कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, सचिव लक्ष्मण करा पंचप्रमुख भरत कररा यांच्या प्रमुख उपस्थिती उद्घाटन समारंभ पार पडले. स्पर्धेचे सुत्रसंचालन प्रवीणकुमार आवळे यांनी केले.
या शालेय तायक्वांदो स्पर्धेत तालुक्यातून 14 वर्षे वयोगटातील खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. स्पर्धा 14 ,17, 19 वयोगट मुली 25 रोजी व 14,17,19 मुले 26 रोजी घेण्यात येणार आहेत. या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक विजेते खेळांडू कोल्हापूर विभागीय स्पर्धेकरिता पात्र ठरतील. सर्व यशस्वी खेळाडूंना डेरवण क्रीडा संकुलाचे संचालक श्रीकांत पराडकर यांनी पुढील स्पर्धेकरीता शुभेच्छा दिल्या.