महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज

रत्नागिरी जिल्ह्यातील माकडांचे होणार निर्बीजीकरण

लांजा :  रत्नागिरी जिल्ह्यातील फळबागा आणि शेतीपिकांना होणारा माकडांचा मोठ्या प्रमाणात होणाऱ्या उपद्रवाच्या पार्श्वभूमीवर त्यांना आळा घालण्यासाठी माकडांचे निर्बिजीकरण प्रस्ताव प्रलंबित असल्याने भात पीक हंगामात शेतकरी त्रस्त झाले आहेत. वानरांची प्रगणना मे महिन्यात वनविभागाकडून करण्यात आली होती.


दरम्यान, राज्य शासनाकडून हिरवा कंदील दिल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यातील माकडांची वानरांची धरपकड करून निर्बीजीकरण मोहीम वन विभागामार्फत राबवली जाणार आहे. जिल्हा वन विभागामार्फत राज्य शासनाकडे माकड वानर यांच्यापासून होणारा उपद्रव दूर करण्यासाठी या प्राण्याचे  निर्बीजीकरण करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आला होता. गोळप येथील शेतकरी श्री अविनाश काळे आणि बागायतदार यांनी माकड वानर यापासून होनर्या उपद्रव बद्दल आवाज उठविला होता सुपारी, आंबा, भात शेती, भाजी पाला,आदी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. माकडांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे शेतीपिकांवरील, फळबागांवरील माकडांचे उपद्व्याप वाढले असून त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. वानर आणि माकडांमुळे होणाऱ्या नुकसानीची दखल घेत पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार,लोकप्रतिनिधींबरोबरच कोकण कृषी विद्यापीठ आणि वनअधिकारी यांची एक समिती स्थापन केली होती अन्य राज्य मध्ये माकडांची संख्येमध्ये वाढ झाल्यानंतर त्यांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून माकडांचे निर्बिजीकरण (monkey sterilisation) केले होते. यामुळे चांगले परिणाम दिसून आले असून त्या पार्श्वभूमीवर कोकणात ही हा उपक्रम राबविला जाऊ शकतो.

समितीमध्ये मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्या अध्यक्षतेखाली कोकणातील आमदार, डॉ. बाळासाहेब सावंत, कोकण कृषीविद्यापिठाचे प्राध्यापक, कृषी आयुक्त आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाचे प्रतिनिधी यांचा अभ्यासगट नियुक्त करण्यात आला होता जिल्हा जिल्हा वनविभागाने राज्य शासनाच्या निर्देशानुसार रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड मध्ये माकड वानर यांची प्रगणना करण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती वनविभाग आणि स्थानिक नागरिक यांच्यावतीने ही सर्वे करण्यात आला होता.

वनविभागाने सर्वेचा डाटा केरळ येथील एका संस्थेला दिला आहे वनविभाग राज्य शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात माकडांची धरपकड होऊन निर्बीजीकरण केले जाणार आहे यासाठी पिंजरे तयार करण्यात येणार आहेत भात पिक हंगाम सुरू झाला आहे माकड वानर यांनी उपद्रव देण्यास सुरुवात केली आहे

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button