रत्नागिरी जिल्ह्यात १,२५,५७९ आनंदाचा शिधा किट्स वितरित
रत्नागिरी, दि. १० : जिल्ह्यामध्ये गुरुवार दि. २ नोव्हेंबर पासून आनंदाचा शिधा वितरणास सुरुवात झालेली आहे. आजअखेर १,२५,५७९ इतके शिधा जिन्नस संचांचे वितरण झालेले आहे. म्हणजेच जवळपास ५०% वितरण पूर्ण झाले आहे.
अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यात दीपावली निमित्त आनंदाचा शिधा वितरीत करण्यात येत आहे. यामध्ये १ किलो साखर, १ लिटर खाद्यतेल, चणाडाळ, रवा, मैदा, पोहे (प्रत्येकी अर्धा किलो) हे सहा जिन्नस १०० रु. च्या एका संचात समाविष्ट आहेत. प्राधान्य कुटुंब लाभार्थी, अंत्योदय
अन्न योजना पात्र शिधापत्रिका धारकांना हा संच रा. धा. दुकानात मिळत आहे. जिल्ह्यातील २,५३, १४४ कुटुंबांना आनंदाचा शिधा वितरीत करण्यासाठी प्राप्त झाला आहे.
अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिका धारक व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारक यांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी वेळेत शिधा संच उपलब्ध करून देण्याच्या व सुट्टीच्या दिवशी देखील गोदाम चालू ठेवण्याबाबतच्या सूचना सर्व तालुक्यांना दिलेल्या आहेत.
जाकीमिऱ्यात, रत्नागिरी, रहाटागर, तसेच रत्नागिरी येथील तेली अळी येथे जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांच्या हस्ते तालुकास्तरावर सर्व तहसीलदार यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात आनंदाचा शिधा संचाचे वितरण करण्यात आले आहे. कोकण विभागात सर्वाधिक प्रमाणात आनंदाचा शिधा संचाचे वितरण जिल्हयात झाल्याचे दिसून येते.
जिल्ह्यामध्ये गुरुवार दि. २ नोव्हेंबर पासून आनंदाचा शिधा
वितरणास सुरुवात झालेली आहे. आज अखेर १,२५,५७९ इतके शिधा जिन्नस संचांचे वितरण झालेले आहे. म्हणजेच जवळपास ५०% वितरण पूर्ण झाले आहे. मागील दोन वेळचा अनुभव पहाता दिवाळी सणासाठी जिल्हा पुरवठा विभागाने वेळीच शिधा मिळावा यासाठी पाठपुरावा केल्याने अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी यांची अल्प किमतीत मिळणाऱ्या या शिधा जिन्नस संचामुळे दिवाळी गोड झाली असून लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.