रत्नागिरी जिल्ह्याला सर्वसाधारण विजेते पद

- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
- विभागीय क्रीडा व कला सांस्कृतिक महोत्सव 2025-26
रत्नागिरी : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहायक आयुक्त समाजकल्याण रायगड द्वारा आयोजित प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण मुंबई यांच्या अधिनस्त शासकीय वसतिगृहामधील प्रवेशित विद्यार्थी-विद्यार्थीनी तसेच अधिकारी, कर्मचारी यांच्या विभागीय क्रीडा व कला, सांस्कृतिक महोत्सव 2025-26 चे सर्वसाधारण विजेते पद रत्नागिरी जिल्ह्याला मिळाले. विभागात दुसरा क्रमांक रायगड तर तिसरा क्रमांक मुंबई उपनगर जिल्ह्याचा आला.
रायगड जिल्ह्यातील खोपोलीमधील बी. एल. पाटील पॉलिटेक्निक महाविद्यालयात 6 व 7 जानेवारी रोजी या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत समाजकल्याण मुंबई विभागाचे प्रादेशिक आयुक्त बाळासाहेब सोळंकी यांच्या हस्ते सर्वसाधारण विजेते पदाचा पुरस्कार रत्नागिरी जिल्ह्याला देण्यात आला. हा पुरस्कार सहाय्यक आयुक्त श्री. घाटे यांच्याबरोबर गृहपाल दीपक जाधव, गृहपाल विनोद देसाई, वरिष्ठ लिपिक उमेश अष्टुरे, कनिष्ठ लिपिक संतोष खेडेकर, संगणक ऑपरेटर गजानन जळके, क्रिस्टल कंपनी मॅनेजर स्वप्निल पवार व इतर कर्मचारी यांनी स्वीकारला.
यावेळी समाज कल्याण रायगड सहायक आयुक्त सुनील जाधव, समाज कल्याण ठाणे सहायक आयुक्त समाधान इंगळे, समाज कल्याण सिंधुदुर्ग सहाय्यक आयुक्त संतोष चिकने, समाज कल्याण मुंबई शहर उपनगर सहायक आयुक्त रविकिरण पाटील व प्राचार्य श्री माने आदी उपस्थित होते.





