ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजस्पोर्ट्स

रत्नागिरी तायक्वॉंदो ओपन चॅलेंज स्पर्धेत लांजा तालुक्याचे घवघवीत यश


लांजा : रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट असोसिएशन मान्यतेने शहानुर चिपळूण तालुका तायक्वॉंदो अकॅडमी यांच्या वतीने 17 वी क्युरोगी (फाईट) व 11वी पुमसे रत्नागिरी जिल्हा ओपन चॅलेंज तायक्वॉंदो जिल्हा स्पर्धा 2024 पुष्कर स्वामी मंगल कार्यालय हॉल बहादुर शेख नाका येथे दि. 6 ते 8 जानेवारी आयोजन करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये लांजा तालुक्याने गाव-गावीत यश मिळवले.

लांजा तालुक्यातील तायक्वॉंदो फिटनेस अकॅडमी लांजातील 40 खेळाडू सहभागी झाले होते. या मध्ये पदक विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे :


1) त्रिशा गणेश यादव – सुवर्णपदक
2) फरहना अमीर जमादार सुवर्णपदक
3) पायल रवींद्र जोशी सुवर्णपदक
4) श्रावणी संतोष शेरे सुवर्णपदक
5) सवाब अमीर जमादार सुवर्णपदक
6) विघ्नेश विनोद दिवाले रौप्य पदक
7) ऋग्वेद अमित जाधव रौप्य पदक
8) रोहन चंद्रकांत साबळे रौप्य पदक
9) श्रेया भीमराव कांबळे रौप्य पदक
10) त्रिशा नारकर रौप्य पदक
11) गणेश शिंदे रौप्य पदक
12) श्लोक खेडेकर रौप्य पदक
13) आर्या सचिन पवार कांस्य पदक
14) सायली सुरेश कांबळे कांस्य पदक
15) ऋग्वेद भेकरे कांस्य पदक
16) परी जड्यार कांस्य पदक
17) श्रावणी बकालकर कांस्य पदक.


तसेच पूमसे या प्रकारात
सब जुनियर मुले संघ रौप्य पदक
1) श्लोक खेडेकर, शुभम पटेल, गणेश शिंदे रौप्य पदक
इंडिव्हिज्युअल पूमसे या प्रकारात
1) लक्ष भगत कांस्य पदक
2) ऋग्वेद भेकरे कांस्य पदक


या स्पर्धेत सहभागी खेळाडू ध्रुव मुकेश आंब्रे, तीर्थ गणेश यादव, रीया प्रमोद लांजेकर, नियाज जमीर जमादार, यास्मिन जमीर जमादार, आयांश स्वप्निल राजेशिर्के, आदिश्री अभय शेट्ये, भक्ती भागवत कुंभार, विना ओंकार देवरुखकर, अभिज्ञा कदम, शौर्य अमित जाधव, शुभम पटेल, निषाद समगिस्कर,विभा नारकर या सर्व खेळाडूंना लांजा तालुका तायक्वॉंदो प्रमुख प्रशिक्षक तेजस दत्तराम पावसकर, लांजा तालुका महिला प्रमुख प्रशिक्षका व राष्ट्रीय खेळाडू तेजस्विनी विरेंद्र आचरेकर व शितल विरेंद्र आचरेकर यांनी मार्गदर्शन केले.


या सर्व यशस्वी खेळाडूंचे तायक्वॉंदो फिटनेस अकॅडमी लांजा चे अध्यक्ष किशोर तुकाराम यादव, उपाध्यक्ष अमोल रेडीज, सचिव तेजस्विनी आचरेकर, सहसचिव अनुजा कांबळे, सदस्य लक्ष्मण कर्ररा, रोहित कांबळे, तायक्वॉंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे खजिनदार व रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष वेंकटेशराव कर्ररा, सचिव लक्ष्मण कर्ररा, उपाध्यक्ष विश्वास लोखंडे, खजिनदार शशांक घडशी व सर्व पालक वर्ग आणि लांजा वासीयांनी अभिनंदन केले.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button