ब्रेकिंग न्यूजरत्नागिरी अपडेट्सराष्ट्रीयरेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हललोकल न्यूज
रत्नागिरी-मुंबई रत्नागिरी- सावंतवाडीसह १० गणपती विशेष गाड्यांचे आरक्षण २५ जुलैपासून होणार सुरु

- कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा
रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर जाहीर करण्यात आलेल्या आणखी दहा विशेष गाड्यांचे आरक्षण 25 जुलै 2025 पासून सुरू होणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी जाहीर करण्यात आलेल्या गणपती विशेष गाड्यांचे आरक्षण टप्प्याटप्प्याने खुले होत आहे. याआधी आजपासून काही विशेष गाड्यांचे आरक्षण सुरू झाले आहे. आता दिनांक 25 जुलैपासून आणखी दहा गणपती स्पेशल गाड्यांचे आरक्षण ऑनलाईन तसेच रेल्वेच्या संगणकीय आरक्षण खिडक्यांवर सुरू होणार आहे.
कोकणात मोठ्या संख्येने गणेशोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांना रेल्वेने जाहीर केलेल्या विशेष गाड्यांमुळे दिलासा मिळाला आहे.