रत्नागिरी येथे गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धन’ प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
-
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरीचा उपक्रम
-
पालघर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, अहमदनगर, बीड, जालनातील प्रशिक्षणार्थी सहभागी
रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विदयापीठ, दापोली अंतर्गत ‘झाडगाव रत्नागिरी येथे असलेल्या ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र मध्ये “गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धन” या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम दि. दि. ६ ते ८ ऑगस्ट २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आला.
या प्रशिक्षण कार्यक्रमाचा उदघाटन समारंभ सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी व प्रमुख डॉ. सुरेश नाईक आणि लांजा येथील प्रगतशील मत्स्य शेतकरी श्री. अब्दुल रेहमान शेजवालकर यांच्या उपस्थितीत दि. ६ ऑगस्ट रोजी पार पडला होता. या प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातून विशेषतः पालघर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, अहमदनगर, बीड, जालना, नंदुरबार तसेच छत्रपती संभाजीनगर येथून एकूण ३९ प्रशिक्षणांर्थीनी सहभाग नोंदविला.
या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत तीन दिवसात सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी मधील डॉ. एस.डी. नाईक, डॉ. ए.यु. पागरकर, डॉ. एच.बी. धमगाये, प्रा. एन.डी. चोगले, प्रा. एस.बी. साटम, व श्रीम. व्ही.आर. सदावर्ते या विषय तज्ञांनी मार्गदर्शन केले. विषयतज्ञ म्हणून विद्यापीठाच्या इतर केंद्रावरून आलेले डॉ. मनोज घुगुस्कर, उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग; डॉ. राहुल सदावर्ते, सहयोगी प्राध्यापक, मत्स्य अभियांत्रिकी विभाग, मत्स्य महाविद्यालय, शिरगाव; डॉ. शशिकांत मेश्राम, संशोधन अधिकारी, तारापोरवाला सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, मुंबई; डॉ. विवेक वर्तक, मत्स्यशास्त्रज्ञ, खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल, जि. रायगड; डॉ. केतन चौधरी, विभाग प्रमुख, मत्स्य अर्थ व विस्तार विभाग, मत्स्य महाविद्यालय, शिरगाव यांनी मार्गदर्शन केलेबाहय विषय विषयतज्ञ म्हणून श्री. अब्दुल शेजवालकर (मत्स्य शेतकरी,लांजा); श्री. अतुल साठे (सागरी उत्पाद निर्यात विकास प्राधिकरण, पनवेल); श्री. रणजीत चव्हाण, श्रीम. पूनम शिर्के, श्रीम. उत्कर्षा कीर (सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, परटवणे, रत्नागिरी) यांनी मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप समारंभ दि. ८ ऑगस्ट रोजी डॉ. प्रकाश शिनगारे (संशोधन संचालक, डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोली) यांच्या उपस्थितीत पार पडला. डॉ. प्रकाश शिनगारे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये प्रशिक्षानार्थिना मार्गदर्शन करताना ‘शेतकऱ्यांनी सामुदायिक प्रयत्नाद्वारे गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धन करावे’ असे आवाहन केले.
यावेळी डॉ. सुरेश नाईक (वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, सा.जि.सं.के., रत्नागिरी) यांनी ‘सदर प्रशिक्षणास आलेले प्रशिक्षणार्थी हे महाराष्ट्र मधील बहुतेक जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व करीत आहेत, त्यांनी प्रशिक्षण घेऊन परत गेल्यावर इतर शेतकऱ्यांना मत्स्यसंवर्धन करण्यास प्रोत्साहित करावे, जेणेकरून राज्यात मत्स्यसंवर्धन मध्ये क्रांती घडविण्यास हाथभार लागेल’ अशी आशा व्यक्त केली. सदर प्रशिक्षण कार्यक्रम बाबत आपले अनुभव कथन करताना प्रशिक्षणार्थीनी (श्री. तात्यासाहेब आरासूल, पाटोदा, बीड; श्री. शरदचंद्र गिते, देवरुख, रत्नागिरी आणि श्रीम. प्रज्ञा पाटील, वसई, पालघर) या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उत्तम आयोजन केल्याबद्दल संशोधन केंद्राचे आभार व्यक्त केले आणि मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या व्यवसायामध्ये करण्याचा मानस व्यक्त केला.
यावेळी प्रास्ताविक भाषण प्रशिक्षण कार्यक्रम समन्वयक डॉ. आसिफ पागरकर (सहयोगी संशोधन अधिकारी) यांनी केले तर डॉ. हरिष धमगाये (अभिरक्षक) यांनी आभार प्रदर्शन केले. समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन साटम (सहाय्यक संशोधन अधिकारी) यांनी केले.
प्रशिक्षण कार्यक्रम आयोजनाकरिता डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोलीचे आदरणीय कुलगुरू डॉ. संजय भावे; विस्तार शिक्षण संचालक डॉ. पराग हळदणकर; संशोधन संचालक डॉ. प्रकाश शिनगारे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र प्रमुख डॉ. एस.डी. नाईक यांचे मार्गदर्शन खाली डॉ. आसिफ पागरकर, डॉ. हरीश धमगाये, प्रा. नरेंद्र चोगले, प्रा. सचिन साटम व श्रीम. वर्षा सदावर्ते यांनी मेहनत घेतली. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजन करिता संशोधन केंद्रातील कर्मचारी श्री. मंगेश नांदगावकर, श्री. महेश किल्लेकर, श्रीमती जाई साळवी, श्री. सचिन पावसकर, श्री. मनिष शिंदे, श्री. दिनेश कुबल, श्री मुकुंद देऊरकर, श्री. राजेंद्र कडव, श्री. सुहास कांबळे, श्री. सचिन चव्हाण, श्री. प्रवीण गायकवाड, श्री. विवेक धुमाळ, श्री. दर्शन शिंदे, श्री. तेजस जोशी, श्री. स्वप्नील आलीम, श्री. योगेश पिलणकर, श्री. उल्हास पेडणेकर, श्री. अभिजित मयेकर यांनी विशेष मेहनत घेतली.