रत्नागिरी सराफा बाजारात सोने दरात 5 हजार रुपयांची घसघशीत वाढ
रत्नागिरी : सोने -चांदी दरात पुन्हा एकदा वाढ नोंदवली गेली आहे. रत्नागिरीतही याचा परिणाम जाणवला. स्थानिक सराफा बाजारातून मिळालेल्या माहितीनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा अंदाजे 1,38,000 (जीएसटीसह) तर 22 कॅरेटचा दर 1 लाख 28 हजार रुपये इतका झाला आहे. यासाठी जीएसटी मात्र वेगळा द्यावा लागणार आहे तर चांदीचा दर प्रतिकिलो 2 लाख 2000 रुपयां वर पोहोचला आहे. दरम्यान, सोन्याच्या दरातील ही वाढ जवळपास 5 हजार रुपये इतकी आहे.
सोने चांदीच्या दरातील या वाढीमुळे ग्राहकांमध्ये काहीशी निराशा पाहायला मिळत असली तरी लग्नसराईचा हंगाम लक्षात घेता खरेदीत फारशी घट दिसत नाही, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. बाजारातील डॉलरचे दर, आंतरराष्ट्रीय बाजारातील चढउतार तसेच स्थानिक मागणी या घटकांमुळे दर वाढ झाल्याचे सराफा व्यावसायिकांचे मत आहे




