ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराष्ट्रीयशिक्षणसायन्स & टेक्नॉलॉजी

राजापूरचे सुपुत्र डॉ. अनिल राघव यांची इस्रोच्या प्रोजेक्ट सिलेक्शन कमिटीवर नियुक्ती

लांजा : नेरके. ता. राजापूर गावचे मूळ रहिवासी डॉ. अनिल राघव यांची इस्रोच्या प्रोजेक्ट सिलेक्शन कमिटीवर नेमणूक झाली आहे. ते भारतातील सर्व विद्यापीठातून एकमेव निवडले गेले आहेत.

डॉ. अनिल राघव हे भारतासाठी इस्रोच्या माध्यमातून 2035 पर्यतचे कुठले कार्यक्रम हाती घ्यायचे, यांची निवड करणाऱ्या मंडळाचे कार्यकारी सदस्य म्हणून निवडले गेले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यासाठी हा मोठा बहुमान नेरके गावच्या डॉ. अनिल राघव यांच्या रूपाने मिळाला आहे. मुबंई विद्यापिठात डॉ. राघव हे भौतिक शास्त्राचे प्राध्यापक आहेत. त्यानी भौतिकशास्त्र या विषयात सुवर्णपदक मिळवून शात्रज्ञ म्हणून मुबंई विद्यापिठात विविध विषयांवर संशोधन केले आहे. मूळ गाव नेरके येथे त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले आहे. वडील बँकेमध्ये मुबंई त नोकरीला असल्याने पुढील शिक्षण त्याचे मुबंई शहरात झाले. त्यांचा एक भाऊ सी ए आहे. भविष्यातील अंतराळ विज्ञान रोडमॅप्स तयार करण्यासाठी इस्रोने सहा गटांची स्थापना केली आहे. तयार केलेल्या सहा गटांमध्ये हे पुढील गट समाविष्ट आहेत :
SG१: खगोलशास्त्र, खगोल भौतिकशास्त्र आणि एक्सोप्लॅनेट
SG२: कॉस्मॉलॉजी आणि गुरुत्वाकर्षण
SG३: ॲस्ट्रोबायोलॉजी, ॲस्ट्रोकेमिस्ट्री आणि स्पेस बायोलॉजी
SG४: हेलिओफिजिक्स आणि स्पेस वेदर
SG५: सौर यंत्रणा अन्वेषण
SG६: Near-Earth Space Exploration.
डॉ अनिल राघव यांना स्प्लिंटर्स ग्रुप SG6: Near-Earth Space Exploration चा सदस्य म्हणून निवडण्यात आले आहे.

UR Rao Satellite Center (URSC) बेंगळुरू येथील URSC कॅम्पसमध्ये भविष्यातील अंतराळ विज्ञान रोडमॅप फॉर्म्युलेशन (SSRF) वर विचारमंथन करणारी चर्चा आयोजित करत आहे. या चर्चेचा उद्देश ISRO च्या भविष्यातील अंतराळ विज्ञान कार्यक्रमांसाठी आवश्यक मोजमापांची यादी तयार करणे आहे.

डॉ. राघव यांना बंगळुरू येथे वैयक्तिकरित्या उपस्थित राहण्यासाठी आणि संवादात योगदान देण्यासाठी औपचारिकपणे आमंत्रित करण्यात आले आहे. निवडीचे वृत्त नेरके गावात कळताच गावकरी यांना आनंद झाला आहे.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button