राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा संघाचा समावेश

रत्नागिरी : तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्यावतीने राज्यस्तरीय कॅडेट तायक्वांदो स्पर्धा दि. १३ ते १५ नोव्हेंबर २०२५ दरम्यान ” साई सिल्व्हर लॅान्स, शिर्डी , जि. अहिल्यानगर “या स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा संघचा समावेश आहे. या संघामध्ये रत्नागिरी तालुक्यातील तायक्वांदो स्पोर्ट सेंटर खेडशी येथील खेळाडूंची निवड राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी झाली आहे.
राज्यस्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे शिर्डी येथे होणाऱ्या कॅडेट तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झालेले खेळाडू क्योरोगी
1) स्वरूप प्रदीप साळुंखे
2) आदित्य संदीप पवार
3 ) सुयश संतोष झोरे
वरील सर्व खेळाडूंना रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन अध्यक्ष श्री वेंकटेश्वर राव कररा उपाध्यक्ष श्री शैलेश गायकवाड श्री. विश्वदास लोखंडे, सचिव श्री लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष श्री शशांक घडशी श्री संजय सुर्वे आणि सर्व पदाधिकारी तसेच तायक्वांदो स्पोर्ट सेंटर खेडशी चे सर्व पदाधिकारी पालक, प्रशिक्षक यांनी अभिनंदन केले विजेते सर्व खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक अमित जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
जिल्हा संघाचे संघ प्रशिक्षक म्हणून तायक्वांदो स्पोर्ट सेंटर खेडशी चे प्रशिक्षक अमित जाधव यांची निवड करण्यात आली आहे यशस्वी सर्व खेळाडू व प्रशिक्षक याचे जिल्हाभरातून अभिनंदन होत आहे





