राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरीच्या स्वरा साखळकरची छाप!
तीन पदकांची कमाई ; कौतुकाचा वर्षाव
मुंबई : मुलुंड येथील कालिदास स्पोर्ट कॉम्प्लेक्स मध्ये राज्यस्तरीय ओपन तायक्वांदो स्पर्धा पार पडली. महाराष्ट्रातून अनेक खेळाडूंनी या स्पर्धेसाठी सहभाग नोंदवला होता. रत्नागिरीमधील एस आर के तायक्वांदो क्लबची खेळाडू स्वरा साखळकर हिने विशेष आपली छाप या स्पर्धेत पाडली. पुमसे प्रकारात वैयक्तिक कांस्य पदक घेऊन आपले खाते उघडले. त्यानंतर क्युरोगी प्रकारात कॅडेट गटात 37 किलो खालील वजनी गटात आणखी एक कांस्य पदक घेऊन दोन पदकांची कमाई केली. पाठोपाठ क्युरोगीमध्ये 35 किलो खालील वजनी गटात खेळताना स्वराने सुवर्णपदकाला गवसणी घालून आपल्या वैयक्तिक तिसऱ्या पदकाची नोंद केली.
या स्पर्धेसाठी स्वरा हिला एस आर के टायकोंडो क्लबचे अध्यक्ष व मुख्य प्रशिक्षक श्री शाहरुख शेख यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
शिर्के हायस्कूलमध्ये इयत्ता पाचवी मध्ये शिक्षण घेणाऱ्या स्वराने केलेल्या कामगिरीबद्दल तिचे असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश भाराजगे, सेक्रेटरी मिलिंद पाठारे, खजिनदार व्यंकटेशराव करा, तालुकाध्यक्ष राम कररा,उपाध्यक्ष मिलिंद भागवत, कोषाध्यक्ष प्रशांत मकवांना, एस आर के तायक्वांदो क्लबचे उपाध्यक्ष अमोल सावंत, सचिव शितल खामकर, कोषाध्यक्ष अंजली सावंत, यांनी शुभेच्छा दिल्या. या यशासाठी विविध स्तरातून कौतुक होत आहे