राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत युवा क्लबला ६ सुवर्ण, २ रौप्य तर ७ कास्य पदके

रत्नागिरी : तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रा यांच्यावतीने आयोजित जळगाव तायक्वांदो असोसिएशन संयोजित छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे १० व्या राज्यस्तरीय तायक्वांदो फाईट व पुमसे स्पर्धेत पंधरा पदके मिळवले आहेत.
या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्यातील युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटर साळवी स्टॉप शाखा ओम साई मित्र मंडळ सभागृह कै. अन्नपूर्णा संगीत कला विद्यालयमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या तायक्वांदो खेळाडूंनी क्योरुग व पूमसे स्पर्धेत सहा सुवर्णपदक दोन रोप्य पदके सात कास्यपदके पटकावून रत्नागिरी जिल्ह्याचा संघ उपविजेता ठरला.
विजेते खेळाडूंचे नाव पुढीलप्रमाणे : सुवर्णपदक – मंथन आंबेकर, सार्थक गमरे, अस्मि साळुंखे, ओवी काळे, रुहि कररा, आराध्य तहसीलदार.
रौप्य पदके
देवांश गराटे, मंथन आंबेकर
कांस्य पदक
सोनाक्षी रहाटे, उत्कर्ष शेट्ये,अरहा आयरे, अस्मि साळुंखे, सार्थक गमरे, आराध्य तहसीलदार, ओवी काळे यां सर्वांनी 15 पदके पटकावून सर्वाची मने जिंकली. स्पर्धेचे संघाचे प्रशिक्षक म्हणून श्री अमित रेवत कुमार जाधव (ब्लॅक बेल्ट थर्ड डॉन) व महिला प्रशिक्षिका सौ .शशिरेखा कररा यानी यस्वीरित्या काम पाहिले.
विजेत्या सर्व खेळाडूंना रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष व्यंकटेश्वर राव कररा (जिल्हा क्रीडा संघटक पुरस्कार विजेते) उपाध्यक्ष. श्री शैलेश जी गायकवाड (PI) विश्वदास लोखंडे (राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक )सचिव लक्ष्मण कररा खजिनदार, शशांक घडशी (जिल्हा क्रीडा पुरस्कार विजेते) तसेच ओम साई मित्र मंडळ सर्व सन्माननीय पदाधिकारी कै.अन्नपूर्णा संगीत कला विद्यालयचे अध्यक्ष अनंत आगाशे ऍड. प्रियाताई लोवलेकर श्री साई सेवा मित्र मंडळ नाचणे गोडाऊन चे अध्यक्ष संतोषजी सावंत उद्योजक गौरांग आगाशे सौ. दीप्ती ताई आगाशे, युवा मार्शल आर्ट तायकांडो ट्रेनिंग सेंटरचे मुख्य प्रशिक्षक राम कररा यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.