ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजशिक्षणस्पोर्ट्स
राज्य शालेय तायक्वांडो स्पर्धेसाठी रत्नागिरीच्या श्रुती काळे हिची निवड

रत्नागिरी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषदेमार्फत आयोजित रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्टस् असोसिएशन यांच्या सहकार्याने दि. १८ व १९ डिसेंबर २०२3 रोजी जिल्हा क्रीडा संकुल रत्नागिरी शिवछत्रपती स्टेडियम बॅडमिंटन हॉलमध्ये पार पडले.
या विभागस्तरीय शालेय तायक्वांदो क्रीडा स्पर्धेत जी. जी. पी. एस.ची श्रुती संतोष काळे हिने सुवर्ण पदक तर शिर्के प्रशालेच्या दिव्या विलास गुरव हिने कास्यपदक मिळवले.
या दोन्ही खेळाडूना प्रशिक्षक राम कररा, प्रतिक पवार,अमित जाधव यांनी मार्गदर्शन केले. श्रुतीची लातूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली असून ती या स्पर्धेसाठी रवाना होत आहे.