राणी स्पोर्ट रत्नागिरी संघ कै. वैजयंती करंडे स्मृती चषकाचा मानकरी

- माळवाशी येथील क्रिकेट स्पर्धेत पाटगाव द्वितीय, कार्तिकी वॉरियर्स तृतीय
देवरूख : माळवाशी येथील ओम साई सेवा मंडळ कडूवाडी व श्री निनावी देवी क्रीडा मंडळ आयोजित टेनिस बॉल क्रिकेट ओव्हरआर्म स्पर्धेत ‘राणी स्पोर्ट रत्नागिरी’ संघाने प्रथम क्रमांक पटकावला. या संघाला माजी सरपंच कै. वैजयंती करंडे स्मृती चषकाने मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

माळवाशी कडूवाडी येथील कै. पांडुरंग करंडे व कै. शिवराम कडू क्रीडा नगरीत ही स्पर्धा झाली. ए वन इलेव्हन फायटर पाटगाव संघाने द्वितीय क्रमांक, कार्तिकी वॉरियर्सने तृतीय, सिध्देश्वर निवे संघाने चतुर्थ क्रमांक पटकावला. उत्कृष्ट फलंदाज प्रणय जाधव, उत्कृष्ट गोलंदाज सागर जाधव, मालिकावीर शुभम आंब्रे यांना गौरवण्यात आले. प्रमोद अधटराव, प्रफुल्ल बाईत, सरपंच निकिता करंडे, उपसरपंच सुनील सावंत, सुबोध पेडणेकर, संजय कदम, मनोहर सावंत, राजू सावंत, प्रमोद पेडणेकर, मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत कडू, बाळकृष्ण करंडे, अनंत कडू, प्रकाश शिंदे आदी मान्यवर बक्षीस वितरणावेळी उपस्थित होते.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ व मंडळाचे कार्यकर्ते महेंद्र कडू, जितेंद्र कडू, सखाराम रावनंग, विशाल भडवलकर, विकास कडू, विशाल कडू, अनिल रांबाडे, सौरभ सावंत, प्रणित कडू, प्रवीण करंडे, संतोष करंडे, रत्नराज सावंत, सुजित रसाळ, भूषण कडू, राज जाधव, आर्यन रावनंग, ओंकार कडू, तन्मय कडू, सार्थक रावनंग, अनिकेत कडू, राज करंडे, दक्ष करंडे, प्रसाद करंडे, वैभव झेपले यांनी या स्पर्धेच्या यशस्वितेसाठी मेहनत घेतली. मुंबई मंडळाचे दिलीप कडू व सर्व पदाधिकारी यांनीही या स्पर्धेला सहकार्य केले.