रामानंदाचार्य नरेंद्राचार्य पादुकादर्शन सोहळ्यामध्ये १३५ महिलांना शिलाई मशीनचे वाटप

नाणीज : महाराष्ट्र,( मराठवाडा) कर्नाटक, तेलंगणा राज्यातील काही ठिकाणी २ ते ११ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत झालेल्या रामानंदचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुका दर्शन सोहळ्यात स्वयंरोजगारासाठी गरजू महिलांना १३५ शिवणयंत्रे वाटण्यात आली.
महाराष्ट्रातील नांदेड, धाराशिव, जालना या ठिकाणी तर कर्नाटक राज्यातील रायचूर, तेलंगणा राज्यातील रंगारेड्डी तसेच निर्मल या ठिकाणी निराधार व गरजू भगिनींना एकूण १३५ शिलाई यंत्रांचे मोफत वाटप करण्यात आले. या शिलाई यंत्रांच्या मदतीमुळे सर्व भगिनी स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वतःच्या कुटुंबाचा चरितार्थ चालवू शकतील.
रामानंदचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने अशा उपयुक्त मदत कार्याच्या रुपाने महिला
सशक्तिकरणासाठी ठोस कृती केली जात आहे.
रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी नेहमीच भक्तीला सत्कार्य आणि लोक कल्याणकारी कार्याशी जोडतात. “तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा” या त्यांच्या या दिव्य मानवतावादी दृष्टीकोनामुळे समाजातील गरजूंना वेळोवेळी विविध प्रकारे सहाय्य केले जाते. जेणेकरून त्यांना जगण्यासाठी आधार मिळेल.
रामानंदचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे दर्शन सोहळे महाराष्ट्रासह विविध राज्यांत संपन्न होत आहेत. त्यांच्या पादुकांच्या दर्शनासाठी हजारो भाविक एकत्र येतात. संपूर्ण दिवस आपल्या नामस्मरणात दंग होतात. अनेक आध्यात्मिक कार्यक्रमांत उत्साहाने सहभागी होतात.

रामानंदाचार्य नरेंद्रचार्य यांच्या प्रेरणेतून महिलांना स्वयंरोजगार मेळावा हेतूने ठिकठिकाणी शिलायंत्रांचे वाटप करण्यात आले.

प्रत्येक पादुका दर्शन सोहळा प्रसंगी रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या प्रेरणेने विविध प्रकारे समाजातील गरजू तसेचआर्थिक दृष्ट्या कमकुवत बंधू – भगिनींना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी व स्वयंरोजगारासाठी मदत केली जाते.





