ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज
रायगड-रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा

- नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
मुंबई : मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील ३ ते ४ तासांत रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे आणि सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार कोकण किनारपट्टीसह डोंगराळ भागात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. नदी, नाले व समुद्र किनाऱ्याजवळ जाणे टाळावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
रायगड, रत्नागिरी हवामान अपडेट्स, कोकणातील पावसाचा अंदाज आणि हवामान विभागाचे ताजे इशारे जाणून घेण्यासाठी स्थानिक प्रशासनाच्या सूचनांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.