महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज

लक्ष्मीपूजनपाठोपाठ रत्नागिरीत भाऊबिजेलाही दमदार पाऊस!

  • फटाके फोडण्यात मग्न असलेल्या बच्चे कंपनीच्या उत्साहावर पाणी
  • व्यापाऱ्यांनी हवामान खात्याच्या इशाऱ्यामुळे घेतली होती खबरदारी

रत्नागिरी: ऐन दिवाळीच्या (Diwali) धामधुमीत कोकणात परतीच्या पावसाने (Paraticha Paus) पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. दिवाळीतील महत्त्वाचा दिवस असलेल्या लक्ष्मीपूजनाच्या (Laxmi Pujan) सायंकाळी रत्नागिरी शहरात जोरदार पाऊस कोसळला. यामुळे फटाके फोडण्याच्या तयारीत असलेल्या बच्चे कंपनीचा हिरमोड झाला, तर त्यांचे अनेक फटाके भिजल्याने नुकसान झाले.

​एवढ्यावरच न थांबता, याच पाठोपाठ आज गुरुवारी सायंकाळी भाऊबीजेची (Bhaubeej) लगबग सुरू असतानाही रत्नागिरीत पुन्हा एकदा दमदार पाऊस (Ratnagiri Rain) कोसळला.

अचानक बदलले वातावरण

गुरुवारी सकाळपासून अगदी सायंकाळपर्यंत चांगले ऊन पडले असताना सायंकाळच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला. गुरुवारी सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. या अचानक आलेल्या पावसामुळे रस्त्याच्या कडेला फटाके (Patake) तसेच दिवाळीसाठी लागणाऱ्या अन्य वस्तूंची दुकाने (Diwali Shopping) मांडून बसलेल्या विक्रेत्यांची (Vikrete) मोठी धावपळ उडाली. आपले साहित्य वाचवण्यासाठी त्यांना कसरत करावी लागली.

रत्नागिरी रेल्वे स्टेशन परिसर

​भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department – IMD) आधीच परतीच्या पावसाचा इशारा (Rain Alert) दिला असल्याने अनेक व्यापारी सतर्क होते. मात्र, सायंकाळी अचानक आलेल्या या पावसाने बच्चे कंपनीच्या आनंदावर विरजण टाकले.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button