लांजातील खंडित वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांची भर पावसात सेवा!
मंगळवारी रात्री वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश
लांजा : नागरिकांच्या रोषाला बळी पडलेल्या परिस्थितीत महवितरण कंपनीचें तांत्रिक कर्मचारी, वायरमन यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून लांजा शहराचा आणि तालुक्याचा खंडित वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी भर पावसात आणि जंगलातून वाटा काढत कर्तव्य बजावत वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश मिळवले. मंगळवारी रात्री उशिराने वीज पुरवठा अखेर या कर्मचाऱ्यांच्या मेहनतीतून पूर्वपदावर आला आहे.
भर पावसात वीज कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीसाठी या कर्मचाऱ्यांच्या जिद्दीला सलाम करावा लागेल. ओणी येथून आलेल्या उच्चदाब विद्युत वाहिनीतून कुवे लांजा बागेश्री येथे सुमारे 10 पोलवरील डिस्क या निकामी झाल्याने आज मंगळवार दिनांक 25 रोजी दुपारपासून वीज गायब झाला होता. लांजा उपविभाग एक आणि दोन या विभागाच्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज कुठून खंडित झाली आहे याचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केला. या शोध ममोहिमेत लांजा बागेश्री या परिसरात काही विद्युत पोलवरील डिक्स निकामी झाल्याचे निदर्शनास आले. येथील दहा कर्मचारी आणि दोन अभियंते या कामासाठी कार्यरत आहेत.
खंडित वीज पुरवठ्याच्या समस्या उद्भवल्या नंतर लांजा महावितरणच्या अनेक तांत्रिक बाजू आणि दोष यांचा निपटारा न झाल्याने वारंवार वीज गायब होणे हे प्रकार घडू लागले आहेत लागले आहेत. लांजा तालुक्यात लांजा शहर आणि उपळे विरगाव येथे दोन फिडर मंजूर झाले आहेत लांजा येथे उपकेंद्र कार्यान्वित आहे. परंतु लांजा फिडर ते आडवली रेल्वे स्टेशन येथे फिडरवरून वीजपुरवठा होण्यासाठी लांजा दाभोळे या राज्यमार्गाचे सर्वेक्षण सुरू आहे. या मार्गाची हद्द निश्चित नसल्याने फिडर ओढण्यासाठी तांत्रिक बाजू अडचणीच्या ठरत आहेत. लांजा शहरातील अनेक ट्रान्सफॉर्मरमध्ये सिंगल फेज आहे थ्री फेजमध्ये कन्वर्ट करण्याचे काम एका कंपनीला देण्यात आले आहे. परंतु या कंपनीने अद्याप हे काम सुरू केलेले नाही.
भांबेड ते ओणी ते लांजा वीजवहन यंत्रणा कार्यान्वित आहे. रत्नागिरी चांदेराई इथून लांजा लांजा येथे होणारा वीज पुरवठा भूमिगत वीज वहन करणारी नवीन यंत्रणेचे काम सुरू असल्याने ओणी इथूनच लांजा तालुक्याला विज पुरवठा होतो. तोडकरी ते शहनाई हॉल या परिसरात दहा पोलची आवश्यकता आहे. याचे सर्वेक्षण तातडीने घेण्यात येणार आहे. विरगाव येथील वीज उपकेंद्र फिडर याची निविदा प्रतीक्षेत आहे. जंगल भौगोलिक परिस्थिती या अडचणीच्या प्रतिकूल परिस्थितीत देखील वीज कर्मचारी आपली ड्युटी बजावत आहेत, त्या कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणे गरजेचे आहे.