लांजातील तरुणाचा सांगलीत खून ; दोघा संशयितांसह अल्पवयीन युवक ताब्यात
सांगली : येथील एका हॉटेल कामगाराचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. शैलेश कृष्णा राऊत (वय २६, मूळ रा. बेनी खुर्द, लांजा, रत्नागिरी, सध्या रा. पारिजात कॉलनी, सावंत प्लॉट) असे या कामगाराचे नाव आहे.
या संदर्भातील अधिक माहितीनुसार गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडलेल्या या घटनेने सांगली शहरात खळबळ उडाली.
या खूनप्रकर्ड स्थानिक गुन्हे अन्वेषणाने सुमित संतोष मद्रासी (२३, इंदिरानगर झोपडपट्टी) आणि सौरभ वावासाहेव कांबळे (२२, त्रिमूती चव्हाण कॉलनी, सांगली) या दोघांसह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. किरकोळ कारणातून झालेल्या वादामधून ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.
खून झालेला शैलेश राऊत हा तरुण सांगलीतील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होता अशी माहिती मिळते आहे. दोन वर्षांपूर्वी त्याचे लग्न झाले होते. त्याची पत्नी आठ महिन्यांची गर्भवती आहे. कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी कुटुंबीयांपासून दूर सांगली येथे राहत असताना त्याच्यासोबत घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
शुक्रवारी दुपारनंतर त्याचा मृतदेह त्याच्या मूळ गावी लांजा शहरापासून सहा किलोमीटरवर असलेल्या बेनी खुर्द येथे आणून अंत्यसंस्कार करण्यात आले.
शैलेश याच्या पश्चात आई-वडील व पत्नी असा परिवार आहे.