ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज
लांजातील पत्रकार जगदीश कदम यांचे अकाली निधन

रत्नागिरी : लांजा येथील पत्रकार जगदीश सुरेश कदम (41) यांचे दि.9 जानेवारी रोजी कोल्हापूर येथे एका खासगी रुग्णालयात अल्पश: आजाराने मंगळवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास अकाली निधन झाले.
मागील जवळपास दोन दशकांपेक्षा अधिक काळ ते पत्रकार म्हणून कार्यरत होते. चिपळूण तालुक्यातील ओमळी हे मूळ गाव असलेलले जगदीश कदम है चिपळूण, गुहागर येथे पत्रकारिता केल्यानंतर गेली अनेक वर्ष लांजा येथे पत्रकार म्हणून ते कार्यरत होते. सध्या त्यांचे रत्नागिरीतील साळवी स्टॉप भागात वास्तव्य होते. हरहुन्नरी, सतत धडपड करण्याची वृत्ती असलेला पत्रकार म्हणून त्यांची ख्याती होती. सामाजिक कामही मोठ्या हिरीरिने करत असत. त्यांचे मंगळवारी अल्पश: आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी, मुलगी असा परिवार आहे.