उद्योग जगतमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज

लांजातील फणस संशोधन केंद्राचा ४० कोटींचा प्रस्ताव शासन दरबारी रखडला

लांजा : लांजातील फणस संशोधन केंद्राचा सुमारे ४० कोटी रुपयाचा प्रस्ताव कोकण कृषी विद्यापीठाने राज्य शासनाला  सादर केलेला असून अद्याप या केंद्राच्या जागेचा प्रश्न अजूनही निकालात गेलेला नाही. राज्य शासनाकडून हिरवा कंदील मिळाला नसल्याने बहुचर्चित फणस संशोधन केंद्र रखडले आहे.

अद्यापही या केंद्राची जागा कुठे निश्चित करावी याची निस्थिती झालेली नाही. पावसाळी अधिवेशनात यावर चर्चा करून मूर्त स्वरूप यावे, असे मागणी लांजातील शेतकऱ्यांनी केली आहे कोकणातील आमदारांनी हा प्रश्न लक्षवेधी करावा ही मागणी होत आहे फणसाच्या लागवडीस तसेच प्रक्रियेस भविष्यात असलेला वाव लक्षात घेऊन लांजा (जि. रत्नागिरी) येथे फणस संशोधन केंद्रांची स्थापना करण्याचा निर्णय राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला आहे प्रशासकीय मान्यता या संशोधन केंद्र ला देण्यात आली आहे नुकताच याबाबतचा प्रस्ताव. ४० कोटी रुपये किमतीचा प्रस्ताव डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने (Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth) तयार केला असून त्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

देश आणि परदेशातील फणस जातींचा अभ्यास करणे, वाणांचा संग्रह, तुलनात्मक अभ्यास, फणसाचे गरे, फणस कुयरीची भाजी, तयार फणसाची भाजी, फणस पल्प व त्यापासून उत्पादने, ताज्या तसेच उकडलेल्या बिया व त्याची पावडर, वर्षभर फणसाचे उत्पादन, फणसाच्या स्वतंत्र जाती तयार करणे, पडीक जमिनीवर लागवड करणे, रोग, किडी, शाखीय व्यवस्थापन यासाठी संशोधन करणे, शेतकऱ्यांना रोपवाटिका, उत्पादन पद्धती तसेच प्रक्रिया पदार्थ यासाठी क्षमता बांधणी प्रशिक्षण राबविणे यासाठी हे संशोधन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. लांजा येथील ५० एकर जागेवर हे संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कृषी परिषदेच्या परिषदेच्या बैठकीसमोर मांडलेल्या प्रस्तावात ४० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. कोकणात फणस मुबलक प्रमाणात मिळत असून हे फळ पौष्टिक, आरोग्यदायी गुणधर्म असलेले फळपीक आहे.
या फळाचे मूल्यवर्धन केल्यास त्याची मूल्यसाखळी निर्माण होऊ शकते. तसेच त्यातून रोजगार निर्मितीही होऊ शकते. यासाठी विद्यापीठाने सविस्तर प्रस्ताव तयार केला आहे
या प्रस्तावात फणसाच्या विविध उपयोगासाठी जाती निर्माण करणे, खाण्यासाठी तसेच गरे तळण्यासाठी कापा फणसाच्या जाती विकसित करणे, बरका फणसाच्या जाती विकसित करणे, फणसाच्या लवकर व भरपूर उत्पादन देणाऱ्या जाती निर्माण करणे, लहान आकाराच्या (नारळी) फणसाच्या जाती विकसित करणे, फणसाच्या वैशिष्टपूर्ण गरे असणाऱ्या जाती विकसित करणे, फणसाच्या गरापासून भाजी करण्यासाठी जाती विकसित करणे, वर्षभर उत्पादन देणाऱ्या जाती विकसित करणे, अधिक उत्पादनासाठी लागवड पद्धती विकसित करणे आदी उद्देश ठरविण्यात आले आहे.
तसेच फणसाच्या विविध जातींची दर्जेदार कलमे तयार करण्यासाठी रोपवाटिकाही उभारण्यात येणार आहेत. फणसाचे मूल्यवधित उपपदार्थांमध्ये रूपांतर करण्यासाठी पिकलेले गरे, फणसाच्या बिया, पाती, सातल आणि आतील पाव आदींपासून उपपदार्थ बनविण्यावर संशोधन करण्यात येणार आहे.संशोधन केंद्रासाठी ५० एकर जमीन प्रस्तावित आहे- संशोधन केंद्रात सहा शिक्षक तर ८ शिक्षकेत्तर कर्मचारी.- पाच वर्षांसाठी ४० कोटी अनुदानाची गरज असल्याचं प्रस्तावात आहे देवधे, गवाने या ठिकाणी 40 एकर जमीन या संशोधन केंद्राला देण्यासंदर्भात कोणत्याही सूचना राज्य सरकारने केलेली नाही.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button